Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Late in life pregnancies

उशिराचे गरोदरपण

(0 reviews)

हल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.

Tuesday, December 19th, 2017

तुमच्या डॉक्टरांशी बोला

प्रत्येक महिलेची परिस्थिती अद्वितीय असल्यामुळे, गरोदरपणापूर्वी तुमच्या वैयक्तिक जोखमीचे घटक आणि एकंदरीत प्रकृती यांचे मूल्यमापन करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील. तुमचे डॉक्टर वैयक्तिक निगा राखण्याविषयी तुम्हाला व्यक्तिगत सल्ला देऊ शकतात.

गर्भधारणेसंबंधी चिंता

गर्भधारणा ही समस्या नसू शकते, पण सर्वसामान्यपणे, तुमच्या वय वर्षे 30 नंतर जननक्षमता कमी व्हायला लागते. महिलांचे वय वाढायला लागते तसे त्यांच्या ओव्ह्यूलेशनची वारंवारता कमी व्हायला लागते किंवा अधिक अनियमित होते, त्यांची अंडी फलित होण्याच्या दृष्टीने अधिक कठीण होतात आणि एन्डोमेट्रिऑसिस व बंद झालेल्या फेलोपिन ट्युबच्या समस्या अधिक आढळून येतात.

तुम्ही गरोदर होण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष प्रयत्न केला असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, विशेषतः तुमचे वय 35 पेक्षा जास्त असेल तर. गर्भधारणा ही दर महिन्यातून काहीच दिवशी होऊ शकते. घरगुती ओव्ह्यूलेशन किटचा वापर करून तुम्ही महिन्यातील सर्वाधिक जननक्षम दिवसांचा मागोवा घेऊन तुमच्या गर्भधारणेच्या शक्यता वाढवू शकता.

तुम्ही गरोदर होत नसाल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा, ते काही चाचण्या ठरवू शकतील. तुमच्या डॉक्टरांनी वंध्यत्वाचे निदान केले तर, तुम्ही जननक्षमतेसाठी उपचारांचा विचार करू शकता. जननक्षमतेचे उपचारांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे जास्त वयाच्या महिला गर्भवती होण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

गरोदरपणाचे जोखमीचे घटक

तिशीतील उशिरा आणि चाळीशीमधील सुरुवातीला अनेक स्त्रियांमध्ये निरोगी गरोदरपण आढळून येत असले तरी, काही घटकांबाबत जागरूक असायला हवे :

आईचे वाढलेले वय वय वर्षे 35 असताना डॉक्टर तुम्हाला “अॅडव्हान्स्ड मॅटर्नल एज” असे संबोधतील आणि केवळ तुमच्या वयावर आधारित तुम्हाला उच्च जोखीम असलेल्या समजतील.

गर्भपाताचा धोकावाढलेला एक धोका म्हणजे गर्भपाताची शक्यता, हा धोका विशीतील महिलांसाठी 15 टक्के असतो, पण 40व्या वर्षी तो 25 ते 30 टक्के इतका वाढलेला असतो.

आरोग्याला धोका.  वय वाढलेल्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, हृदयाचे आजार, प्लॅसेंटा फाटणे, प्रीक्लॅम्प्शिया आणि झटके यांची प्रवृत्ती वाढते. 

प्रसूतीमधील फरक. जास्त वयाच्या आईला लवकर प्रसूती आणि लांबलेल्या प्रसूतीवेदना, सिझेरियन प्रसूती आणि जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे यांचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते.

बहु गर्भ. गर्भधारणेसाठी ज्या महिला जननक्षमतेचे उपचार घेतात त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे गरोदरपणात संभाव्य गुंतागुंती वाढतात. जननक्षमतेचे उपचार घेतलेले नसतील तरीही जास्त वयाच्या मातांमध्ये जुळी किंवा तिळी होण्याचे प्रमाण अधिक असते.

या शक्यता असल्या तरी, तुमच्या वयामुऴे तुम्हाला या सगळ्या स्थितीचा अनुभव येईलच असे काही नाही. प्रगत वैद्यकीय निगेमुळे या स्थितीवर यशस्वीरित्या मात करणे शक्य होते.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.