Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Why do You Need a Preconception Visit

तुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते

(1 review)

गरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.

Tuesday, December 19th, 2017

गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेण्याचे लाभ जाणून घ्या
गर्भधारणेपूर्वी तपासणी किंवा डॉक्टरांना भेटण्याचे काही लाभ खाली दिले आहेत :

 • तुमचे गरोदर राहण्याच्या शक्यता वाढतात.
 • तुम्हाला निरोगी गरोदरपण आणि निरोगी बाळ होण्यामध्ये मदत होते.
 • तुम्ही संततीनियमनाची साधने वापरत असल्यास ती कधी थांबवायची त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.
 • मद्यपान किंवा धूम्रपानासारखी विशिष्ट जीवनशैली किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे तुमची गरोदर राहण्याची शक्यता कमी होऊ शकते. गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांना भेटल्यास, तुम्ही आणि तुमचे बाळ यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या होऊ नयेत यासाटी वरील गोष्टी नियंत्रणात आणण्यात मदत होऊ शकते.

तुम्हाला गरोदर राहण्यापूर्वी किमान 3 महिने आधी गर्भधारणेपूर्वीच्या भेटीची वेळ ठरवावी लागेल. मातृत्वाच्या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही गरोदरपणाची डायरी लिहायला सुरुवात करू शकता.

गर्भधारणेपूर्वीच्या भेटीत डॉक्टरांना विचारायच्या गोष्टी
गरोदर राहण्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्वांबद्द्ल डॉक्टर तुम्हाला सांगतीलच. मात्र, काही राहून गेले असेल तर खालील यादीची तुम्हाला मदत होईल.
गर्भधारणेपूर्वीच्या भेटीत खालील गोष्टींबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा :

 • तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबात असणाऱ्या आरोग्याच्या समस्या
 • तुम्ही फॉलिक अॅसिडचे सेवन कधी सुरू करू शकता
 • गरोदरपणापूर्वी तुम्हाला कोणत्या लशी घेण्याची गरज आहे का
 • तुम्हाला पॅप टेस्ट सारख्या स्क्रीनिंग टेस्ट घेण्याची गरज पडू शकते
 • मधुमेह, थायरॉईडचे आजार, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा, इत्यादी आरोग्यांच्या समस्यांचे व्यवस्थापन. 
 • तुम्ही घेत असलेली औषधे, औषधांच्या दुकानातून घेतलेली, डॉक्टरांनी नेमून दिलेली आणि पूरक म्हणून घेतलेली
 • निरोगी वजन मिळवण्याचे मार्ग
 • सकस पदार्थांची निवड करण्याचे मार्ग आणि शारिरीकदृष्ट्या सक्रिय राहणे
 • तुमचे दात आणि हिरड्या यांची निगा राखण्याचे मार्ग
 • ताण कमी करण्याचे, धूम्रपान सोडण्याचे आणि मद्य टाळण्याचे मार्ग आणि इतर आजार.
 • आधीच्या गरोदरपणाच्या समस्या, मुदतीपूर्वीच बाळाचा जन्म होण्यासारख्या समस्यांसह1
 • एचआयव्हीसह लैंगिक संसर्गातून झालेल्या आजारांसाठी तपासण्या

या गोष्टींचे टिपण काढून ठेवल्यामुळे तुम्हाला डॉक्टरांशी चर्चा करणे सोपे जाईल आणि या प्रकारे तुमचे विचारायचे काहीही राहून जाणार नाही.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

 • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
 • toolTry our tailored practical tools
 • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

1 review

24/02/2018 - 11:23am

Compurx

Prescription Pad is a clinic management software provides all types of facilities for hospitals & doctors. The best part of the software is Prescription writing facilities for doctors & drug & brand interaction checker tool. For more info please visit: http://www.prescriptionpad.in

1 out of 1 people found this review helpful

Search

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.