मात्र चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त त्यामागील विज्ञान जाणून घेण्याची गरज आहे.
हार्मोनमुळे स्तनांमध्ये बदल होतात.
गरोदरपणात दिसणाऱ्या इतर लक्षणे आणि बदलांप्रमाणेच, स्तनांमधील बदल हेसुद्धा हार्मोनमधील बदलांमुळे होतात. गरोदरपणात मोठ्या प्रमाणात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन आईच्या शरीरात तयार होतात. या हार्मोनमुळे स्तनांमधील मॅमरी ग्रंथी वाढतात आणि त्याच्या शाखा निर्माण होतात जेणेकरून ते दूध निर्मिती आणि स्तनपानच्या तयारीला सुरुवात करू शकतात.
स्तनांमध्ये सामान्यपणे आढळणारे बदल.
गरोदरपणात सर्वसामान्यपणे दिसून येणाऱ्या काही बदलांमध्ये दुखरे स्तन, मोठे झालेले स्तन, आणि स्तनाग्रांमध्ये बदल यांचा समावेश होतो. मात्र काही वेळा अजिबात बदल दिसत नाहीत किंवा अगदी कमी बदल दिसतात.
दुखरे स्तन : पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीच्या काळात तुमचे स्तन दुखरे किंवा हळवे होऊ शकतात. काही स्त्रियांमध्ये हे येणाऱ्या मासिक पाळीचे लक्षणदेखील असू शकते आणि त्यामुळे त्या याकडे दुर्लक्ष करू शकतात. तुम्ही तुमच्या स्तनांना हात लावता तेव्हा हलकेसे दुखरेपण जाणवू शकते. तुम्हाला खूप वेदनाही जाणवू शकतात. मात्र, त्याबद्दल चिंता करायची गरज नाही कारण ही दोन्ही लक्षणे सामान्य असतात आणि पहिल्या तिमाहीमध्ये अधिक तीव्र असतात.
स्तनाग्रांमध्ये बदल : तुमचे गरोदरपण पुढे जाते तशी तुमची स्तनाग्रे मोठी आणि गडद होत जातात. तुम्हाला तुमच्या स्तनाग्रांभोवतीच्या गडद भागावर लहान पुरळ किंवा फोडासरखा पांढरा भाग दिसू शकतो, त्याला मॉन्टगोमरीज ट्युबरक्युलस असे म्हणतात. या तैलग्रंथी असतात, तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देता तेव्हा त्याला दूध ओढणे सोपे जावे यासाठी या तैलग्रंथींमधून स्नेहन मिळते.
स्तन मोठे होणे : पहिल्या तिमाहीच्या शेवटी किंवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे स्तन वाढत असल्याचे आढळून येईल. स्तनाच्या आतील ऊती बाळाच्या पोषणासाठी तयार होत असल्यामुळे हे घडते.
द्रव स्रवणे : गरोदरपणाच्या अखेरीस काही मातांना त्यांच्या स्तनांमधून काही द्रव स्रवत असल्याचे किंवा त्यांच्या स्तनाग्रांवर एक पातळ अथवा चिकट थर तयार झाल्याचे आढळेल. याबद्दल चिंता करण्यासारखे काहीच नाही. या स्रवाला कोलोस्ट्रम असे म्हणतात. तुमच्या शरीरामध्ये तयार होणारे हे पहिले दूध असते, ते तुमच्या बाळाला जीवन सुरू करताना आवश्यक असलेले सर्व पोषण आणि रोग प्रतिकारकशक्ती व संरक्षण देते. त्यामुळे चिंता करू नका, फक्त ते दिसण्याजोगे असेल तर किंवा तुम्हाला अधिक आराम मिळावा यासाठी ब्रेस्ट पॅड वापरा.
स्तनांमध्ये काहीच बदल नाही : काही वेळेला तुमच्या स्तनांमध्ये काहीच बदल होत नाहीत किंवा अगदी कमी बदल होतात. चिंता करू नका, हे अतिशय सामान्य आहे आणि त्यामुळे यशस्वी गरोदरपणा किंवा स्तनपानाचे नाते यावर काहीही परिणाम होणार नाही.
बदल सामान्य असतात, म्हणून तुमचा त्याबद्दलचा दृष्टीकोनही सामान्य असला पाहिजे.
गरोदरपणात, तुम्ही तुमच्या स्तनांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या स्तनांना व्यवस्थित बसणाऱ्या ब्राचा आधार देण्यासारखे काही उपयुक्त उपाय तुम्ही करू शकता. तुम्ही व्यायाम करत असाल तर, स्पोर्ट्स ब्रा वापरण्याची काळजी घ्या. मऊ सुती कापडापासून तयार केलेल्या ब्राच नेहमी वापरा. कृत्रिम धाग्याच्या ब्रा टाळा कारण त्यामधून हवा खेळती राहत नाही आणि अतिरिक्त घाम येऊन तुम्हाला अवघडल्यासारखे वाटू शकते. तसेच अति घट्ट कपडे टाळावेत. या काळात तुमचे स्तन मोठे होत असल्यामुळे त्यावरील त्वचा विस्तार पावते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी दररोज स्तनांना मॉईश्चराईझ करा. आणि स्तनांच्या स्वच्छतेची काळजी घेण्याची खबरदारी घ्या. लक्षात ठेवा, तुमच्या स्तनांना कोणताही संसर्ग झाला तर, तुम्ही स्तनपान देणे सुरू केल्यानंतर तुमच्या बाळाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews