Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 How to best utilize your visit to the doctor

तुमच्या डॉक्टरांच्या भेटीचा सर्वोत्तम वापर कसा करायचा

(0 reviews)

डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये सहसा रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांना भेटण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही क्लिनिकमध्ये वाट बघण्यात घालवू शकता. तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरांबरोबर सर्वसामान्यपणे 10 ते 15 मिनिटे वेळ व्यतीत करता.

Thursday, December 14th, 2017

तुम्ही या थोड्या मिनिटांचा सर्वोत्तम वापर कसा करू शकता? खाली काही टिपा दिल्या आहेत :

भेटीची वेळ ठरवून घ्या : नेहमी भेटीची वेळ आधी ठरवून तुमच्या डॉक्टरांना भेटायचा प्रयत्न करा, अपवाद फक्त आपत्कलानी स्थितीचा.

तुमचे सर्व वैद्यकीय कागदपत्रे घेऊन जा : डॉक्टरांकडे जाताना नेहमी तुमच्यासोबत सर्व वैद्यकीय कागदपत्रे, अँटेनॅटल कार्ड, चाचण्यांचे अहवाल, प्रिस्क्रिप्शन इत्यादी घेऊन जा.

तुमच्या समस्यांची यादी करा आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा : तुम्हाला असणार्या समस्या किंवा भेडसावणार्या चिंता, ज्यांबद्दल तुम्हाला डॉक्टरांशी चर्चा करावयाची आहे त्याबद्दल एक टिपण तयार करा. तुम्हाला ज्या समस्यांची चर्चा करायची आहे त्याचा तुम्हाला किती चिंता वाटते त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा.

तुमच्या सर्व समस्यांविषयी चर्चा करा : तुमच्या सर्व समस्यांविषयी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. काही गोष्टी तुम्हाला किरकोळ चिंतेच्या वाटत असू शकतील पण त्याचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

तुमचा मोबाईल बंद करा : तुमच्या भेटीच्या वेळी तुमचा मोबाईल फोन स्वीच ऑफ करा.

तुमच्या सर्व चाचण्या करून घ्या : डॉक्टरांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या सर्व चाचण्या आणि स्कॅन करून घ्या जेणेकरून डॉक्टर ते अहवाल पाहू शकतील.

तुम्ही डॉक्टरांना भेटण्यापूर्वी व्यवस्थित तयारी करून जा, त्यामुळे तुम्हाला मिळणार्या काही मिनिटांमध्ये तुम्ही डॉक्टरांशी तुमच्या आरोग्याविषयी चर्चा करू शकाल.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.