Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Your Age and Fertility

तुमचे वय आणि जननक्षमता

(0 reviews)

जननक्षमता म्हणजे गर्भधारणा होण्याची क्षमता, गर्भ संपूर्ण कालावधीसाठी राखणे आणि एका निरोगी बाळाला जन्म देणे. स्त्रिया विशीच्या सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त जननक्षम असतात. 30 वर्षे वयाच्या आतील, नियमित लैंगिक संबंध ठेवणार्या निरोगी जोडप्यांना प्रत्येक महिन्याला गर्भधारणेचे 25-30% संधी असते.

Friday, December 15th, 2017

वय वर्षे 35 नंतर, गर्भधारणेची शक्यता लक्षणीयरित्या घटते. जीवनातील आधुनिक प्रवाहांमुळे स्त्रिया उशीरा गर्भवती राहतात आणि त्यामुळे वयाशी संबंधित गर्भपात व व्यंधत्वाच्या समस्या सर्वसामान्य बनल्या आहेत. 
तुमचे वय वाढते त्यानुसार गर्भधारणा होणे अधिक कठीण का होते?

तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर सहा महिने गर्भधारणेचा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञाची भेट घेतली पाहिजे.

  • प्रथम, तुम्ही जन्माला येताना तुमच्या अंडाशयात एक ठराविक संख्येइतकी अंडी होती. तुमचे वय वाढत जाते तसे, या अंड्यांची संख्या तसेच त्यांचा दर्जा कमी होत जातो आणि तुमची जननक्षमता घटत जाते. तुमचे वय 45-55 पर्यंत जाते तेव्हा तुमच्या अंडाशयामध्ये अंडी तयार होण्याची प्रक्रिया थांबते आणि तुमचा मेनोपॉज येतो.
  • दुसरे, तुम्हाला पूर्वीपासून असलेल्या वैद्यकीय समस्या जाणवायला लागतात, जसे की युटेरिन फायब्रॉईड्स, एंडोमेट्रियॉसिस, उच्च रक्तदाब, आणि मधुमेह इत्यादी, त्यामुळे संपूर्ण काळ गर्भ राखणे आणखी कठीण होते आणि तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी गुंतागुंत वाढत जाते.
  • त्याशिवाय तुमचे वय वाढते तसे लैंगिक संबंध कमी होत जातात.
  • तुमचे वय वर्षे 35 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या बाळामध्ये गुणसूत्रांच्या विकृतीचा धोका वाढतो. तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळासाठी डाऊन्स सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, इत्यादींयासारख्या काही जनुकीय चाचण्या करून घ्यायला सांगतील.
  • त्याशिवाय वाढत्या वयानुसार, गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधी जन्माचा धोका – गर्भधारणेपासून 38 आठवडे पूर्ण होण्याच्या आत – आणि बाळ मृतावस्थेत जन्माला येण्याचे धोकेदेखील वाढतात.
  • विशीतील स्त्रियांपेक्षा तिशीतील स्त्रियांमध्ये सिझेरियन प्रसूतीचे, यामध्ये संसर्ग आणि आतडी व मूत्राशयासारख्या अंतर्गत अवयवांना इजा पोहोण्याचा धोका असतो, प्रमाण अधिक असते.

तुमचे वय वर्षे 35 पेक्षा अधिक असेल आणि सहा महिने संततीनियमनाशिवाय लैंगिक संबंध ठेवले असतील आणि तरीही तुम्ही गर्भवती राहिला नसाल तर तुम्ही व्यंधत्वाची चाचणी करून घ्यायला हवी. तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचे वय 35 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांची जास्त वेळा भेट घ्यायला लागेल.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.