असे का होते?
सकाळच्या आजारांचे बहुतांश कारण हे शरीरामधील हार्मोनमध्ये होणाऱ्या प्रचंड बदलांमुळे होत असल्याचे मानले जाते. मात्र, त्याचे खरे कारण अद्याप प्रस्थापित व्हायचे आहे. गरोदरपणातील मळमळ आणि उलट्या यांची काही संभाव्य कारणे ही बहुतांश करून हार्मोनमधील स्रवांशीच संबंधित असतात.
एचसीजी हार्मोनमुळे मळमळ होते : गरोदरपणात शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ह्युमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) या हार्मोनचा स्राव होतो. यामुळे आईच्या अंडाशयातून इस्ट्रोजेन स्रवते, त्यामुळे मळमळ होते.
प्रोजेस्टरोनमुळे स्नायू शिथिल होतात : गरोदरपणात प्रोजेस्टरोनची पातळी वाढल्यामुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे बाळाची वाढ आणि जन्म सोपे होते. मात्र, याच कारणाने पोट आणि आतड्यांचे स्नायू देखील शिथिल होतात, त्यामुळे अतिरिक्त गॅस्ट्रिक अॅसिड स्रवते, आणि त्यामुळे गॅस्ट्रो-इसोफेगल रिफ्लक्स (पोटातील आम्ल उलट्या दिशेने वाहते आणि छातीत जळजळ होते) होते. ऊर्जेचे प्लॅसेन्टल ड्रेनेज झाल्यामुळे रक्तातील साखर कमी होते (हायपोग्लायसेमिया), हे देखील मळमळ होण्याचे एक संभाव्य कारण मानले जाते, मात्र अजून त्याची खातरजमा झालेली नाही.
वासाबद्दल अति संवेदनशील होणे : अनेक गरोदर स्त्रियांमध्ये हा सर्वात जास्त आढळणाऱ्या त्रासापैकी एक आहे. वासाबद्दलची संवेदना वाढल्यामुळे पचनसंस्था अति उत्तेजित होते आणि त्यामुळे गॅस्ट्रिक अॅसिड बाहेर पडते आणि त्यामुळे उलट्यादेखील होऊ शकतात.
बिलिरूबीनची पातळी वाढणे : बिलिरूबीनच्या (यकृतामध्ये आढळणारे एन्झाईम) पातळीत वाढ झाल्यामुळे देखील उटल्या होऊ शकतात.
तुम्ही याला प्रतिबंध कसा करू शकता?
उलट्यांची लक्षणे निश्चित प्रमाणात कमी करण्यावर सर्व उपायांचा भर असतो.
कार्बोहायड्रेट समृद्ध फराळ : तुम्ही सकाळी लवकर बिस्किटे, टोस्ट, इत्यादी कार्बोहायड्रेटनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. लहान प्रमाणात कार्बोहायड्रेटनी समृद्ध फराळ घेणे देखील फायद्याचे असते - पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळे आणि भाज्या, जसे की, टोमॅटो, द्राक्षे, कलिंगड, पालक आणि लेट्युस. त्यामध्ये लिंबू आणि आले टाका, त्याचा आणखी फायदा होतो.
रिकाम्या पोटी राहणे टाळा : रिकाम्या पोटी राहिल्यास गॅस्ट्रिक द्रवांची पातळी वाढते आणि त्यामुळे उलट्या होऊ शकतात. उलट्यांचे प्रमाण जास्त असल्यास स्निग्धता अधिक असलेले, साठवलेले आणि कृत्रिम सुगंधी पदार्थ खाणे टाळा.
द्रवपदार्थांचे सेवन वाढवा : उलट्यांमुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे, तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचे रस, ताक आणि शहाळ्याचे पाणी असे पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांनी, तसेच भरपूर पाण्याने ती झीज भरून काढण्याची खबरदारी घ्या.
तुमच्या उलट्यांवर दीर्घकाळ नियंत्रण येत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण लक्षात ठेवा, यामध्ये चिंता करण्यासारखे काही नाही. गरोदरपणात सर्वात जास्त आढळणारे हे लक्षण आहे आणि गरोदर स्त्रियांपैकी जवळपा, 50-70 टक्के महिला यातून जातात.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews