Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Antenatal Care - When Should You See the Doctor

पूर्वप्रसूती काळजी – तुमच्या डॉक्टरांची भेट कधी घ्यावी

(0 reviews)

गरोदरपणासंबंधी सुरुवातीची लक्षणे दिशाभूल करणारी असू शकतात. तुम्हाला कसे वाटत आहे त्याची अनेक संभाव्य कारणे असतात. तुम्ही गरोदर आहात असे तुम्हाला वाटत असेल तर गरोदरपणाची घरगुती एक किंवा दोन चाचण्या घ्या. तुमचा निकाल सकारात्मक आला तर तुमच्या डॉक्टरांकडून त्याची खात्री करून घ्या.

Monday, December 18th, 2017

गरोदरपणाची घरगुती चाचणी
गरोदरपणाच्या घरगुती चाचणी औषधांच्या दुकानात उपलब्ध असतात आणि त्या तुम्हाला पाच मिनिटांमध्ये निकाल देऊ शकतात.

त्या कसे काम करतात?

गर्भधारणेनंतर 11 ते 14 दिवसांनी – किंवा पाळी चुकल्यानंतर साधारण एक दिवसाने – मूत्र चाचणी एचसीजी (ह्युमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन) या गरोदरपणाच्या हार्मोनचा शोध घेऊ शकते.

त्या अचूक असतात का?

घरी केलेल्या गरोदरपणाच्या चाचण्या बऱ्यापैकी अचूक असतात, तरी त्या कधीकधी तुम्हाला चुकीचा निकाल देऊ शकतात, त्यामुळे दुबार तपासणीसाठी एका आठवड्याने ही चाचणी पुन्हा करणे चांगले. तुमच्या चाचणीचा  निकाल सकारात्मक आला तर – किंवा तुम्हाला निकालाची खात्री वाटत नसली तर तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याचा पाठपुरावा करा. 

अधिक अचूक निकालासाठी टिपा

•    तुम्ही चाचणी सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचना वाचा आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
•    आधी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ पिऊ नका, अन्यथा त्यामुळे एचसीजीची पातळी कमी होईल.
•    तुमच्या लघवीची सकाळी सर्वात आधी चाचणी करा, कारण तेव्हा ती सर्वात अधिक संहत असते.
•    तुमची चाचणी नकारात्मक आली आणि तरीही तुम्हाला खात्री वाटत नसेल तर डॉक्टरांच्या भेटीची वेळ ठरवून घ्या.

घरी केलेल्या चाचणीपेक्षा तुमच्या डॉक्टरांनी केलेली चाचणी अधिक अचूक असू शकते.

माझी चाचणी सकारात्मक आली? पुढे काय?

तुमच्या गरोदरपणाची खात्री करून घेण्यासाठी आणि पूर्वप्रसूती तपासणीसाठी तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची ही वेळ आहे!  

तुमचे डॉक्टर एचसीजीचे अस्तित्व तपासण्यासाठी तुमच्या रक्ताचा नमुना घेऊ शकतात, हे ओव्ह्यूलेशननंतर 11 ते 14 दिवस इतक्या लवकर शोधता येते. तुमच्या रक्तामध्ये एचसीजीचे नेमके किती प्रमाण आहे त्याची देखील ते चाचणी घेऊ शकतात, जेणेकरून तुमचे गरोदरपण किती पुढे गेले आहे त्याची सुरुवातीची माहिती मिळू शकते.

डॉक्टर तुम्हाला गरोदरपणाची मूत्र चाचणी देखील करायला सांगू शकतात, ही तुम्ही वापरलेल्या घरगुती गरोदरपणाच्या टेस्ट किटसारखी असते. तुमच्या गरजांनुसार, तुमचे डॉक्टर तुम्हाला आहाराचा सल्ला देऊ शकतात आणि पूरक आहार कोणता घ्यायचा ते सांगू शकतात. पालकत्वाच्या काळजीसाठी सगळे काही सुरळीत आहे ना हे तपासण्यासाठी ते इतर काही संबंधित चाचण्याही घेऊ शकतात.

गुंतागुंती असल्याशिवाय तुम्ही गरोदरपणाच्या 28व्या आठवड्यापर्यंत तुम्ही दर 4-6 आठवड्यांनी तुमच्या डॉक्टरना भेटू शकता. 36व्या आठवड्यांपर्यंत दर पंधरा दिवसांनी, आणि त्यानंतर दर आठवड्याला भेटू शकता. या भेटींदरम्यान, तुमचे डॉक्टर तुमचे वजन, रक्तदाब तपासतील, तुमच्या लघवीची चाचणी घेतली आणि बाळाची वाढ तपासतील. यादरम्यान तुम्हाला काही समस्या किंवा चिंता असतील तर त्या डॉक्टरांना विचारण्याची खात्री करा.

अल्ट्रासाउंड स्कॅन

बहुतेक स्त्रियांमध्ये पहिले स्कॅनिंग गरोदरपणाच्या 11-13व्या आठवड्याच्या सुमाराला केले जाते. अल्ट्रासाउंड स्कॅनमुळे तुमच्या डॉक्टरांना गरोदरपणाची जागा निश्चित करण्यात (गर्भधारणा गर्भाशयात झाली आहे की नाही), तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळ होणार आहेत का ते ठरवण्यात, गरोदरपणाचा आकार मोजण्यात (तुमच्या बाळाच्या जन्माचा विश्वसनीय दिवस ठरवण्यासाठी), आणि बाळाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी मदत होते. काही विशिष्ट विकृती, जसे की बाळाच्या मानेच्या मागील जागेभोवती द्रवाचे वाढलेले प्रमाण (न्युकल ट्रान्सलुसन्सी), हे डाऊन्स सिंड्रोमचे लक्षण असू शकते, तेही या टप्प्याला शोधता येते.

गर्भधारणेच्या 20-22 आठवड्यात तपशीलवार स्क्रीनिंग स्कॅन केल्यामुळे बाळाच्या शरीररचनेत विकृती असल्यास ओळखण्यात मदत होते. मेंदू, हृदय, हातपाय आणि इतर अवयवांमध्ये काही दोष असल्यास ते या टप्प्याला शोधता येतात.  

इतर चाचण्या

काही विशिष्ट उच्च जोखीम गटातील महिलांना इतर काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज असू शकते. तुमचे प्रसूतीतज्ज्ञ या चाचण्यांविषयी तुमच्याशी चर्चा करतील. उदाहरणार्थ, काही महिलांना मधुमेहासाठी चाचणी करण्याची गरज असू शकते. तुम्हाला मधुमेह असण्याचा उच्च धोका असल्याचे मूल्यमापन झाले तर गरोदरपणातील ओरल ग्लुकोज टेस्टची गरज पडू शकते. या चाचणीसाठी तुम्हाला आदल्या रात्री उपास करायला लागेल. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जाईल आणि त्यानंतर ग्लुकोज घातलेले ग्लासभर दूध पिल्यानंतर एक किंवा दोन तासांनी पुन्हा रक्ताचे नमुने घेतले जातील. 

काही विशिष्ट कीटाणूंची (बॅक्टेरिया) चाचणी करण्यासाठी व्हजिनल स्वॅब घेतला जाऊ शकतो. यापैकी एक, ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस हा बाळासाठी धोकादायक असू शकतो आणि तुमच्यामध्ये हा बॅक्टेरिया आढळला तर तुम्हाला प्रसववेदनांच्या वेळी अँटीबायोटिक्स घेण्याची गरज पडेल.

प्रत्येक भावी मातेचे स्वतःचे असे काही विशिष्ट गुणधर्म आणि गरजा असतात. प्रत्येक गरोदरपण निराळे असते आणि प्रत्येक स्त्रीसाठी ठराविक प्रमाण निगा असे काही नसते. तुमची आणि तुमच्या मैत्रिणीची प्रसतीपूर्व निगा ही वेगवेगळी असू शकते. तुमचे आरोग्य, तुमचे गरोदरपण आणि प्रसूती यांच्यविषयी माहिती विचारण्यासाठी तुमच्या क्लिनिकच्या भेटीचा वापर करा.

तुमच्या भेटीसाठी ३ टिपा
तुमच्या डॉक्टरांना भेटणे हे फक्त तुमच्या गरोदरपणाची खात्री करणे किंवा तुमची व तुमच्या बाळाची सुरुवात चांगली होत आहे याची खातरजमा करण्यासाठी नियमित चाचण्या करणे यापुरतेच मर्यादित नसते. ही प्रश्न विचारण्याची आणि पुढे काय वाढून ठेवले आहे ते जाणून घ्यायची देखील ही संधी आहे. या साध्या टिपा वापरून डॉक्टरांबरोबरच्या तुमच्या भेटीचा जास्तीत जास्त वापर करून घ्या.

1. सज्ज राहा
एकदा तुमच्या चाचण्या आणि स्कॅनिंग पूर्ण झाले की दुसऱ्या कोणत्याही तज्ज्ञाच्या भेटीसाठी जाताना त्या तुमच्यासोबत ठेवण्याची खबरदारी घ्या. भरपूर प्रश्न विचारायला आणि त्याची उत्तरे लिहून घ्यायला विसरू नका, अनेकदा तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचे पहिल्यांदा कळते तुम्हाला माहिती करून घेण्यासारखे बरेच काही असते, सर्व गोष्टी लिहून ठेवल्यामुळे तुम्हाला नंतर सर्व काही आठवण्यास मदत होते.
2. कृतीशील व्हा
तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे त्याची प्राधान्यक्रमाने यादी करा. तुमच्या चिंता मांडायला घाबरू नका – अगदी लहान गोष्टींचाही तुमच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक बाबीविषयी डॉक्टरांबरोबर चर्चा करा. 
3. भेटीवर लक्ष केंद्रीत करा
तुमचा मोबाईल बंद करून ठेवा जेणेकरून तुमचे लक्ष विचलित होणार नाही.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.