Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Induced labour pain

प्रवर्तित प्रसव वेदना

(0 reviews)

प्रसववेदना कृत्रिमपणे सुरू केल्या जातात तेव्हा त्यांना “प्रवर्तित/प्रेरित” असे म्हणतात. काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की नैसर्गिक प्रसव वेदनांपेक्षा प्रवर्तित प्रसव वेदना कमी वेदनादायक असतात. या स्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम काय ते ठरवण्यासाठी पुढील भाग वाचा.

Monday, December 18th, 2017

प्रवर्तित प्रसव वेदना कशासाठी?
गरोदरपण लांबले तर बाळाला धोका होऊ शकतो, अशा वेळी प्रवर्तित प्रसव वेदनांचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्लॅसेंटा कमकुवत होतो आणि बाळाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषणमूल्ये पुरवू शकत नाही आणि कदाचित काम करणेही बंद करू शकतो.

प्रसव वेदना प्रवर्तित करण्याचे अनेक मार्ग असतात :
मेम्ब्रेन स्ट्रिप मेम्ब्रेन स्वीप किंवा स्ट्रिपमुळे प्रसववेदना उत्तेजित होतात आणि ही स्ट्रिप होणाऱ्या प्रसूती लांबलेल्या आईला दिल्या जातात, विशेषतः त्यांचे पहिले गरोदरपण असेल तर. गर्भाभोवती असलेले मेम्ब्रेन हटवले जाते आणि हा इंडक्शनचा सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग आहे.

मेम्ब्रेन कृत्रिमरित्या फाडणे किंवा एआरएम याचा अर्थ होतो ‘पाणी फोडणे’ किंवा आईची अॅम्नियॉटिक पिशवी फोडणे. आईला प्रसववेदना सुरूच होत नसतील तर, काही डॉक्टर अजूनही प्रसववेदना सुरू करण्यासाठी आणि त्या वाढवण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. बहुतांश डॉक्टर या पद्धतीला प्राधान्य देत नाहीत कारण यामुळे पाणी फोडल्यानंतर बाळाला संसर्ग होण्याची भीती असते. प्रसववेदना वाढवण्यासाठी इतर पद्धतींबरोबर या पद्धतीचा वापर केला जातो तेव्हा त्याचे परिणाम होत असलेले दिसून आले आहे.

प्रोस्टाग्लँडियन : तोंडावाटे गोळी दिली जाते किंवा योनीमध्ये जेल लावले जाते. या पदार्थामुळे सर्व्हिक्सच्या भिंती पातळ होतात. ही पद्धत स्वतंत्ररित्या वापरली जाते किंवा ऑक्सिटॉसिनसह वापरली जाते.

सायन्टोसिनॉन : हे ऑक्सिटॉसिन हार्मोनचे कृत्रिम स्वरूप आहे आणि वर सांगितलेल्या पद्धती अयशस्वी ठरल्या तर सुरुवातीला कमी डोसमध्ये हे वापरले जाते. इतर पद्धतींपेक्षा या पद्धतींचे अनेक दुष्परिणाम आहेत. दुसऱ्या पद्धती यशस्वी ठरल्या नाहीत तर, सायन्टोसिनॉनला पर्याय म्हणून डॉक्टर सिझेरियनचा पर्याय स्वीकारू शकतात, कारण सायन्टोसिनॉनमुळे जोरदार कळा येऊ लागतात आणि बाळावर प्रचंड ताण टाकला जातो.

तुम्ही कोणतीही पुढील पायरी उचलण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच श्रेयस्कर असते. तुमचे डॉक्टरच तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता ते सांगू शकतात. अखेरीस, शांत राहा आणि खात्री बाळगा आणि तुमच्या बाळाचे या जगात स्वागत करण्याच्या आनंदाची वाट बघा.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.