Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Follow the Folic Acid

फॉलिक अॅसिडचा वापर करा

(0 reviews)

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे नियोजन करत आहात याचाच अर्थ तुम्ही एक हुशार होऊ घातलेली माता आहात. तुम्हाला तुमचे डॉक्टर सर्वात आधी फॉलिक अॅसिड सुरू करायला सांगतील. का ते आश्चर्य वाटते का? मग हे वाचा.

Thursday, December 14th, 2017

फॉलिक अॅसिड म्हणजे काय आणि गरोदरपणात ते इतके महत्त्वाचे का असते?
फॉलिक अॅसिड हे एक प्रकारचे बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असते, तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीची सामान्य वाढ आणि विकासासाठी याची गरज असते. DNA संश्लेषणासाठी फॉलिक अॅसिड महत्त्वाचे असते आणि त्यामुळे ते वाढ व विकास आणि ऊतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.
अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया अगदी गरोदरपणापूर्वी आणि गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये दररोज 400 मायक्रोग्रॅम(0.4 मिग्रॅ) फॉलिक अॅसिडचे सेवन करतात, त्यांच्या बाळांमध्ये पुढील गोष्टींची शक्यता कमी होते :

  • मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये (मज्जासंस्थेची नलिका) जन्मतः दोष असण्याची शक्यता 70% कमी
  • हृदयात दोष
  • तोंडामधील जन्मदोष जसे की, फाटलेला टाळू आणि फाटलेला ओठ

गरोदरपणापूर्वीफॉलिक अॅसिडच्या मात्रेची शिफारस: 400 मायक्रोग्रॅम/दिवस
गरोदारपणादरम्यान : 500 मायक्रोग्रॅम/दिवस
>1000 मायक्रोग्रॅम/दिवस, जर तुमच्या कुटुंबामध्ये मज्जासंस्थेच्या नलिकेमध्ये दोष असल्याचा किंवा सिकल सेल डिसीजचा (चंद्रकोरीच्या आकाराच्या रक्तपेशी असण्याचा जन्मदोष) इतिहास असेल तर

 

फॉलिक अॅसिडचे सेवन कधी करावे? भारतामधील जवळपास एक चतुर्थांश गरोदरपणाचे नियोजन केलेले नसते/हेतू नसतो. गरोदरपणाच्या पहिल्या 28 दिवसांच्या कालावधीमध्ये, साधारणपणे आपण गरोदर आहोत हे एखाद्या महिलेला कळण्यापूर्वीच मज्जासंस्थेच्या नलिकेमध्ये दोष येऊ शकतात..
तुम्ही गर्भधारणा करण्यापूर्वी किंवा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात फॉलिक अॅसिडचे सेवन केले तरच ते या दोषांपासून संरक्षण करू शकते. त्यामुळे मूल होण्याच्या वयातील सर्व स्त्रियांनी फॉलिक अॅसिडचे सेवन केले पाहिजे, कारण तुम्हाला गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही गरोदर आहात याची कल्पना नसू शकते.
मला माझ्या नियमित आहारातून फॉलिक अॅसिड मिळू शकत नाही का?
काही अन्नपदार्थांमधून तुम्हाला फोलेट मिळू शकते, हे फॉलिक अॅसिडचे वेगळे स्वरूप आहे. मात्र, गरोदरपणात संरक्षणासाठी जितके फॉलिक अॅसिड आवश्यक असते तितके तुम्हाला तुमच्या आहारातून मिळू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही तुमच्या आहारात फॉलिक अॅसिडचा समावेश केला तरी ते पूरक म्हणून घेण्याची खबरदारी घ्यावी.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.