Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 What are Ovulation Kits

ओव्ह्यूलेशन किट म्हणजे काय

(0 reviews)

तुम्ही सर्वाधिक जननक्षम कधी असता हे माहिती करून घेणे त्रासदायक आणि वेळखाऊ असू शकते. ओव्ह्यूलेशन किट तुम्हाला तुम्ही अंडे कधी बाहेर सोडता ते शोधण्याचा सोपा आणि सोयीचा मार्ग आहे.

Monday, December 18th, 2017

तुम्ही अंडे बाहेर सोडण्यापूर्वी जवळपास 12-36 तास तुमचे अंडाशय लुटेनायजिंग हार्मोन (एलएच) तयार करते, त्यामुळे अंडे बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला प्रेरणा मिळते. तुमच्या रक्तात आणि लघवीमध्ये या हार्मोनचे प्रमाण वाढले की ओव्ह्यूलेशन किटमध्ये असलेली रसायने ते शोधून काढते आणि त्यामुळे ओव्ह्यूलेशनचा कालावधी सांगता येतो.
ओव्ह्यूलेशन किट कसे वापरायचे?

  • ओव्ह्यूलेशन शोधून काढण्यासाठी तुम्हाला एकतर टेस्ट स्टिकवर लघवी करावी लागेल किंवा तुमची लघवी एका निर्जंतुक भांड्यात गोळा करावी लागेल आणि टेस्ट स्टिक त्यामध्ये बुडवावी लागेल.
  • किटच्या पुस्तिकेमधील सूचनांमध्ये सांगितली असतील तितके मिनिटे वाट बघा आणि त्यांतर निकाल वाचा.
  • तुम्ही कोणत्या प्रकारची स्टिक वापरता त्याप्रमाणे निरनिराळे निकाल मिळतात. तुम्ही ओव्ह्यूलेट करत असाल तर डिजीटल स्टिक अधिकचे चिन्ह दाखवते किंवा स्मायली चेहरा दाखवते. एलएच आढळले तर डिजीटल नसलेली स्टिक विशिष्ट रंग दर्शवते. 

तुम्ही महिन्यातून पाच दिवस चाचणी घेतली तर ओव्ह्यूलेशन दिसून येण्याची 10 पैकी 8 अशी शक्यता असते. आणि 10 दिवस चाचणी घेतली तर 10 पैकी 9.5 शक्यता असते. त्यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर, 10 दिवस चाचणी घेणे योग्य.

हे किट तुम्ही कधी वापरावे?
ओव्ह्यूलेशन किटमध्ये 5-7 किंवा अधिक स्टिक्स येतात. एलएच वाढलेले शोधण्यासाठी तुम्हाला अनेक दिवस चाचणी करावी लागेल म्हणून इतक्या स्टिक्स असतात.

  • तुमची मासिक पाळी नियमित असेल आणि ती 28 दिवस लांबीची असेल तर ओव्ह्यूलेशन साधारणपणे 13-15 या दिवसांमध्ये येते.
  • तुमच्या मासिक पाळीचे चक्र अनियमित असेल आणि त्याची लांबी 27-34 दिवस अशी बदलत असेल तर तुम्ही पाळीच्या 11व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत, ओव्ह्यूलेशन दिसून येत नाही तोपर्यंत, चाचणी केली पाहिजे.

सकारात्मक निकाल याचा अर्थ असा की तुम्ही पुढील 24-36 तासांमध्ये अंडे बाहेर सोडणार आहात.
किट वापरण्यापूर्वीची तयारी
चाचणीपूर्वी जास्त प्रमाणात द्रव पिण्याचे टाळा. तुम्ही ऑस्ट्रोजेन, प्रोजेस्टरोन, टेस्टोस्टरोन किंवा क्लोमिड हे घटक असलेली औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
किटचे तोटे
तुमचा मध्ये एखादा दिवस चुकला तर तुम्हाला कदाचित एलएचची नोंद करता येणार नाही. क्वचितच किट चुकीच्या ओव्ह्यूलेशनचा अंदाज वर्तवू शकते.
तुम्हाला सलग दोन किंवा तीन महिन्यांमध्ये ओव्ह्यूलेशन आढळले नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.