तुमचे अंडाशय दर महिन्याला दोन मासिक पाळीच्या साधारण मध्यकाळात एक अंडे बाहेर सोडते. याला ओव्ह्यूलेशन (अंडे बाहेर टाकण्याची प्रक्रिया) असे म्हणतात.
बहुतेक महिलांमध्ये हे साधारण पुढील अपेक्षित मासिक पाळीच्या 2 आठवडे आधी होते. एकदा अंडे सोडण्यात आले की ते तुमच्या जोडीदाराच्या शुक्राणूंबरोबर फलित होण्यासाठी, तुमच्या फेलोपियन ट्यूबमध्ये साधारण 24 तासांपर्यंत राहते, हे शुक्राणू तुमच्या शरीरात जवळपास 3 किंवा जास्त दिवस तग धरून राहतात. या कालावधीमध्ये शरीरसंबंध ठेवल्यास तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता वाढते.
ओव्ह्यूलेशनचा मागोवा ठेवण्यासाठी ओव्ह्यूलेशन कॅलेंडर राखणे हा सोपा मार्ग असतो.
तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर ओव्ह्यूलेनशनचा मागोवा घेण्याच्या अनेक पद्धतींचा, वापर करण्याचा सल्ला दिला जातो, जसे की, मूलभूत शारिरीक तापमान, सर्व्हिकल म्युकस पद्धत किंवा ओव्ह्यूलेशन किट वापरणे.
ओव्ह्यूलेशन कॅलेंडर कसे वापरावे?
- तुम्हाला 8-12 महिन्यांच्या कॅलेंडरवर तुमच्या मासिक पाळीची नोंद करून ठेवावी लागते. या नोंदीमुळे तुम्ही आगामी महिन्यांमध्ये कोणत्या तारखांमध्ये सर्वाधिक जननक्षम असाल त्याचा पल्ला मिळतो. रक्तस्रावाचा पहिला दिवस हा तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस मोजला जातो.
- तुमच्या मासिक पाळीची लांबी दर महिन्याला बदलू शकत असल्यामुळे, प्रत्येक महिन्यात ती किती दिवस सुरू होती याची तुम्ही नोंद करून ठेवण्याची गरज असते. सरासरी मासिक पाळीचे एक चक्र 28 दिवसांचे असते, पण ती 21-35 दिवस अशी बदलू शकते.
- तुमच्या सर्वात कमी दिवसांच्या चक्रांमधील दिवसांच्या संख्येमधून 18 वजा करा. ही नवीन संख्या घ्या आणि तुमच्या पुढील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून, या नवीन संख्येइतके दिवस मोजा. तुमच्या कॅलेंडरवर ही तारीख नोंदवा, हा तुमचा पहिला जननक्षम दिवस असतो.
- तुमच्या सर्वात जास्त दिवसांच्या चक्रांमधील दिवसांच्या संख्येमधून 11 वजा करा. ही नवीन संख्या घ्या आणि तुमच्या पुढील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून, या नवीन संख्येइतके दिवस मोजा. तुमच्या कॅलेंडरवर ही तारीख नोंदवा, हा तुमचा शेवटचा जननक्षम दिवस असतो.
- कॅलेंडर पद्धती काढून मोजलेल्या या पहिल्या आणि शेवटच्या दिवसांच्या काळामध्ये तुम्ही सर्वात जास्त जननक्षम असता.
ओव्ह्यूलेशन कॅलेंडरबद्दल चांगली गोष्ट कोणती आहे?
- ओव्ह्यूलेशनचा मागोवा घेण्याची ही सर्वात कमी खर्चिक आणि सर्वात कमी गुंतागुंतीची पद्धत आहे. तुम्हाला दर महिन्याला महागडे टेस्ट स्टिक विकत घ्यावे लागत नाहीत, तसेच थर्मामीटरची गरज पडत नाही, किंवा तुमच्या सर्व्हिकल म्युकसची तपासणी करण्यासाठी तुमच्या रोजच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढायची गरज पडत नाही.
ओव्ह्यूलेशन कॅलेंडरबद्दल कोणती गोष्ट चांगली नाही?
- इतक्या तारखा आणि मासिक पाळीच्या चक्राची लांबी लिहिण्याचे लक्षात ठेवणे अडचणीचे असू शकते.
- ही सर्वात किफायतशीर पद्धत असली तर ती ओव्ह्यूलेशन किट्सप्रमाणे विश्वसनीय तारखा सांगू शकत नाही.
- तुमचे मासिक पाळीचे चक्र समान लांबीचे नसेल तर कॅलेंडर पद्धत फारशी प्रभावी नसते. तुमची मासिक पाळी अतिशय अनियमित असेल, कधीकधी 45-60 दिवस इतकी लांबण्याइतकी, किंवा अनेकदा तुमची मासिक पाळी चुकत असेल तर गर्भधारणेसाठी तुम्ही लैंगिकदृष्ट्या कधी सक्रिय असले पाहिजे हे सुचवणाऱ्या अनेक तारखांचा पल्ला निघतो. हे व्यवहार्य असत नाही आणि निराशाजनक असू शकते.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews