तुमचे सर्वात जननक्षम दिवस शोधण्यामध्ये खालील पद्धतींची मदत होईल :
सर्व पद्धती एकत्रितरित्या वापरून जननक्षम दिवसांच्या नोंदी करण्यासाठी एक डायरी राखा. यामुळे तुम्हाला नियोजित प्रकारे गरोदर राहण्यात मदत होईल.
- कॅलेंडर पद्धत : कॅलेंडर पद्धतीमध्ये 8-12 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येक मासिक पाळीच्या चक्राची लांबी कॅलेंडरवर नोंदवली जाते. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसाला तुमच्या कॅलेंडरवर वर्तुळ करा, हा दिवस पहिला म्हणून मोजला जाईल. प्रत्येक महिन्याला तुमची मासिक पाळी किती दिवस सुरू होती ते नोंदवून ठेवा.
- तुमचा पहिला जननक्षम दिवस शोधा : तुमच्या मासिक पाळीच्या सर्वात लहान चक्रामध्ये जितके दिवस असतील त्यामधून 18 ही संख्या वजा करा. उदाहरणार्थ, तुमचे मासिक पाळीचे सर्वात लहान चक्र 25 दिवसांचे असेल तर, 25 मधून 18 वजा करा, 7 ही संख्या मिळेल. तुमच्या सध्याच्या चक्रामध्ये जर तुमच्या पाळीचा पहिला दिवस सहा ही तारीख असेल तर तो पहिला दिवस धरा. तुमच्या सध्याच्या मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवसापासूनचे दिवस मोजा, आणि 7 वा दिवस एक्स माना. या प्रकरणामध्ये 12 तारीख ही 7 वा दिवस असेल, हा तुमचा पहिला जननक्षम दिवस असेल.
- तुमचा शेवटचा जननक्षम दिवस शोधा : तुम्ही सर्वात जननक्षम कधी असाल हे शोधण्यासाठी तुमच्या मासिक पाळीच्या सर्वात मोठा चक्रामध्ये जितके दिवस असतील त्यामधून 11 ही संख्या वजा करा. उदाहरणार्थ, तुमचे मासिक पाळीचे सर्वात मोठे चक्र 30 दिवसांचे असेल तर, 30 मधून 11 वजा करा, 19 ही संख्या मिळेल. आता, तुमच्या सध्याच्या मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवसापासून 19 हा आकडा मोजा आणि तो 19 वा दिवस एक्स माना. तुम्ही मोजत असताना पहिला दिवस सुद्धा धरा. या प्रकरणामध्ये, तुम्ही एक्स ही खूण केलेली तारीख 24 वी असेल.
या गणितावर आधारित तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 11 ते 24 या तारखांदरम्यान सर्वात जास्त जननक्षम असता. कृपाय याची नोंद घ्या की 18 वा आणि 11 वा या अचल संख्या आहेत आणि तुम्ही कॅलेंडर पद्धत वापरत असताना तुम्ही हे अचूक गणित वापरणे गरजेचे असते.
मात्र, सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी, ही पद्धत जननक्षम जागरूकता पद्धतींबरोबर वापरा, जसे की ओव्ह्यूलेशन पद्धत किंवा मूलभूत शारिरीक तापमान पद्धत.
ओव्ह्यूलेशन पद्धत : ओव्ह्यूलेशन पद्धतीला सर्व्हिकल म्युकस पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये संपूर्ण महिनाभरात म्युकसचे प्रमाण, पोत आणि दिसणे या गोष्टींचे निरीक्षण, जाणीव आणि नोंदी ठेवणे यांचा समावेश असतो.
- तुमच्या मासिक पाळीनंतर लगेचच, तुमच्या योनीत फारसा म्युकस नसेल किंवा ती कोरडी असेल.
- अंडे पक्व व्हायला लागते, तसे योनीमध्ये म्युकस वाढायला लागतो आणि तो पांढरा किंवा पिवळा असतो आणि दिसायला दाट व चिकट असतो.
- ओव्ह्यूलेशनच्या अगदी आधी, तुमच्या योनीमध्ये सर्वात जास्त म्युकस असेल आणि तो कच्च्या अंड्यातील पांढऱ्या बलकाप्रमाणे नितळ आणि घसरणारा असतो. कधी कधी तो दूर ताणता येतो. या काळात तुम्ही सर्वात जास्त जननक्षम असता आणि त्याला ओले दिवस असेही म्हटले जाते.
- ओल्या दिवसांनंतर 4 दिवसांनी म्युकस कमी होतो आणि तो पुन्हा चिकट व घट्ट होतो. याला शुष्क दिवस असे म्हणतात.
कॅलेंडरवर तुमच्या म्युकसमधील हे बदल नोंदवा आणि हे दिवस ‘चिकट’, ‘शुष्क’ किंवा ‘ओले’ असे नोंदवून ठेवा. तुम्ही खालील वेळेत सर्वाधिक जननक्षम असता :
- तुमच्या मासिक पाळीनंतर ओलेपणाचे पहिले चिन्ह
- ओलेपणा सुरू होण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस
मूलभूत शारिरीक तापमान पद्धत : तुम्ही सकाळी उठता तेव्हा शांत असलेले तुमचे शरीराचे तापमान, हे मूलभूत शारिरीक तापमान म्हणून ओळखले जाते. ओव्ह्यूलेशनबरोबर तुमचे मूलभूत शारिरीक तापमान किंचित वाढते. अनेक महिने दररोज या तापमानाची नोंद केल्यास तुम्हाला तुमचे सर्वात जननक्षम दिवस शोधण्यात मदत होईल.
तुमच्या जननक्षमतेचा अचूकपणे मागोवा घेण्यासाठी या तिन्ही पद्धती एकत्रितपणे वापरा.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews