मात्र, त्यांच्यापैकी बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्या तरी अनेक गोष्टी मिथकेच असतात.
सकाळी होणारा त्रास म्हणजे माझ्या बाळाला कदाचित पुरेसे पोषण मिळत नाही.
सत्य हे आहे की, सकाळी होणारा त्रास म्हणजे गरोदरपणाच्या लक्षणांपैकी एक सर्वात सामान्य लक्षण आहे, ते तुमच्या शरीरातील हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होते. या अवस्थेमध्ये अन्न दिसल्यामुळे, त्याच्या वासामुळे किंवा विचारामुळेही तुम्हाला मळमळू शकते.
गरोदरपणातील पहिल्या काही महिन्यांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण कमी असते. उलट, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही स्त्रियांचे वजन कमी होते. शरीरातील पाणी कमी होणे, वजन प्रचंड कमी होणे किंवा सकाळचा त्रास गंभीर होणे अशी दक्षतेची लक्षणे तुम्हाला आढळत नाहीत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही.
तुमच्या बाळाला शक्य असेल तोपर्यंत स्वतःच्या पोषणाच्या सर्व गरजा ते तुमच्या शरीरातून भागवेल आणि गरोदर राहण्यापूर्वी तुमचे आरोग्य चांगले असेल तर, तुम्ही पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत तुमच्या बाळाच्या आरोग्याची चिंचा करण्याची गरज नसते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला काटेकोरपणे पाळा आणि सल्ला दिल्याप्रमाणे पूरक आहार घ्या.
पोटाला होणाऱ्या हलक्याशा स्पर्शानेही बाळाला इजा होऊ शकते.
तुमच्या गर्भाशयात तुमच्या बाळाचे चांगले संरक्षण असते आणि ते तरंगत असलेल्या अॅम्नियॉटिक द्रवामुळे हलके धक्के, अडथळे आणि पडणे अशा गोष्टींनी त्याला धक्के बसत नाहीत. त्याशिवाय ओटीपोटाचे स्तर हे किरकोळ अपघातांमध्येही गर्भाचे संरक्षण करते.
मात्र, तुम्हाला कळा आल्या किंवा योनीतून रक्तस्राव झाला तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
जड वस्तू वाहून नेल्यास प्रसववेदनांना चालना मिळेल.
हे अंशतः खरे आहे. जड सामान उचलल्यामुळे पाठीचे दुखणे वाढू शकते आणि त्यामुळे मणक्याला इजा होऊ शकते. मात्र, त्याचा तुमच्यावर ताण पडत नसेल आणि तुम्ही ते योग्य प्रकारे केले तर काही प्रमाणात वजन उचलणे ठीक आहे. उदाहरणार्थ, वाणसामानाच्या पिशव्या आणि लहान मुलांना उचलणे तुम्ही योग्य प्रकारे केल्यास ते अगदी योग्य ठरेल.
आता त्यासाठी योग्य तंत्र कोणते? कोणतीही वस्तू उचलण्यासाठी गुडघ्यांमधून वाका आणि ती तुमच्या शरीराजवळ ठेवून वाहून न्या. तुमच्या पाठीवर वाकू नका म्हणजे त्यामुळे तुमच्या पाठीवर परिणाम होणार नाही. तसेच तुमच्या शरीराच्या एकाच भागावर ताण देण्याऐवजी, वजनाचा भार दोन्ही हातांवर सारखाच टाका.
व्यायामाने माझ्या बाळाचे नुकसान होईल .
कोणताही व्यायामप्रकार तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुरू केला पाहिजे. तंदुरुस्त राहिल्यामुळे तुमची तग धरण्याची क्षमता वाढते आणि बाळाच्या जन्माच्या थकवणाऱ्या प्रक्रियेसाठी तुमची तयारी होते. व्यायाम केल्याने तुम्ही थकत नसल किंवा तुमच्या अंगात उष्णता अधिक वाढल्यासारखे वाटत नसेल किंवा श्वास लागत नसेल तर तुम्ही व्यायाम करू शकता. उलट ज्या स्त्रियांना व्यायामाची सवय नसते त्यांना अनेकदा गरोदरपणात थोडा व्यायाम सुरु करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना जड व्यायामाची सवय नसते त्यांच्यासाठी वेगाने चालणे हा सर्वात सुरक्षित व्यायाम असू शकतो. गरोदर स्त्रिया पोहोणे सुरू ठेवू शकतात. प्रशिक्षित व्यावसायिकाच्या देखरेखीखाली आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा. तसेच श्वसनाचे व्यायाम आणि प्राणायम करण्याचाही सल्ला दिला जातो कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. प्रमाणपत्रधारक प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली तुम्ही योगासनेही करू शकता. फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुम्ही व्यायाम करत असताना तुमच्या शरीरात पुरेसे पाणी राहील याची खबरदारी घ्या.
गरोदर स्त्रियांसाठी हवाई प्रवास सुरक्षित नसतो.
हे अंशतः खरे आहे. तुमच्या प्रसूतीची तारीख ६ आठवड्यांपेक्षा दूर असेल तर एखाद वेळेला हवाई प्रवास करणे अगदी सुरक्षित असते. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेतून गेल्यामुळे तुमच्या बाळावर काहीही परिणाम होणार नाही. तुमचा हवाई प्रवास लांबचा असेल तर विमानात थोडे फिरा आणि तुमचे पाय पसरून पसा.
मात्र, सातत्याने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी थोडी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.
मोबाईल, मायक्रोवेव्ह आणि अगदी कम्प्युटरसुद्धा हानीकारक असतात.
कम्प्युटर हे संपूर्णतः सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. मायक्रोवेव्हचा विचार करता, त्यातून गळती होत असेल तरच तुम्हाला किरणोत्सर्गाचा धोका असतो. सुरक्षेचा उपाय म्हणून हे चालू असताना तुम्ही त्यापासून जितक्या सुरक्षित अंतरावर राहू शकाल तितके राहा. याच प्रकारे, मोबाईलमुळे तुमच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही.
माझे बाळ फार फिरताना दिसत नाही, त्याचा विकास हळू होत आहे का?
नाही. तुमच्या बाळाची हालचाल त्याच्या वेगाने सुरू होते आणि त्याच वेगाने सुरू राहते. तुम्हाला तुमच्या बाळांच्या हालचालींची अत्यंत काळजी वाटत असेल तर, अधूनमधून मोजत राहा. तुम्हाला बारा तासांच्या कालावधीत 11 वेळा हालचाली जाणवत असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज0 नाही. तुमच्या प्रसूतीची तारीख जवळ येईल त्यानुसार याची वारंवार गरज पडेल. तुम्ही प्रत्यक्ष मोजत नाहीत तोपर्यंत काही हालचाली कदाचित तुमच्या लक्षात येणार नाहीत, आणि त्यामुळे तुम्हाला भीती वाटू शकेल.
मी गरोदर असताना माझे केस डायने रंगवू नयेत
खरे आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये हेअर कलरसारखी रसायने टाळणे सर्वोत्तम, कारण ही रसायने टाळूमध्ये शोषली जातात आणि रक्तप्रवाहात मिसळतात.
गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र ते तितके धोकादायक नसते. तरीही नैसर्गिक आणि वनस्पतींपासून तयार केलेल्या केसांच्या रंगांना प्राधान्य द्यावे.
बाळ खाली असणाऱ्या गरोदर महिलांना मुलगा होतो. आणि गर्भधारणेत मुरुमे आली तर मुलगी होते.
चूक. स्त्रीच्या गर्भाशयात बाळ कसे असते हे तिच्या शरीराचा प्रकार आणि ती आधी गरोदर राहिली आहे की नाही यावर अवलंबून असते. पण दोन्ही बाबतीत बाळाचे लिंग कळून येत नाही. सर्वसामान्यपणे उंच महिलांचे बाळ वरील भागात असते तर बुटक्या आणि स्थूल स्त्रियांचे बाळ खालील भागात असते. दोन्हीचा बाळाच्या लिंगाशी संबंध नसतो. तसेच, दुसऱ्या गरोदरपणात बाळ थोडे खाली असू शकते कारण ओटीपोटाचे स्नायू थोडे शिथिल झालेले असू शकतील.
याच प्रकारे, गरोदरपणातील मुरुमांचाही बाळाच्या लिंगाशी संबंध नसतो; ते फक्त सामान्य हार्मोन बदलामुळे येतात.
गर्भाच्या हृदयाचे हळू ठोके म्हणजे मुलगा आणि जलद ठोके म्हणजे मुलगी.
हृदयाचे ठोके हे बाळाचे लिंग दर्शवतात असे ठोसपणे सिद्ध करणारे कोणतेही संशोधन नाही. तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके दोन वेगवेगळ्या प्रसूतीपूर्व भेटींमध्ये वेगवेगळे असू शकतील, गर्भाचे वय आणि भेटीच्या वेळी त्याच्या सक्रियतेचा स्तर यावर ते अवलंबून असते.
गरोदर स्त्रीने मांजराची विष्ठा/मूत्र साफ करू नये.
हे खरे आहे. मांजरीच्या विष्ठेमध्ये टॉक्सोप्लाझ्मॉसिस या विषाणूचा संसर्ग असतो. गरोदरपणासाठी हा विषाणू अतिशय धोकादायक असू शकतो. वास्तविक, फक्त मांजरीची विष्ठा उचलल्यानेच नाही तर, हा विषाणू मांजरीच्या रस्त्यातून जाताना, तिच्या पंजामधून, कुठूनही हल्ला करू शकतो. त्यामुळे मांजराबरोबरचा संपर्क कमी केला पाहिजे आणि घर अधिक स्वच्छ राखले पाहिजे.
तुम्हाला या मिथकांमागील खरी कारणे आणि विज्ञान तुम्हाला माहिती असेल तेव्हा ते हसण्यावारी न्यायचे असते. तुमच्या शेजारच्या काकू काय सांगतात ते ऐकून घ्या, पण त्याचे पालन करायची गरज नाही!
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews