वास्तवात, गरोदरपणात जवळपास निम्म्या स्त्रियांना काही विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ किंवा नेहमीपेक्षा वेगळे अन्न खाण्याचे डोहाळे लागतात. सर्वात लोकप्रिय डोहाळ्यांमध्ये गोड आणि खारट पदार्थांचा समावेश होतो, तर काही स्त्रियांना मसालेदार किंवा स्निग्ध पदार्थ खाण्याची इच्छा होते. हे डोहाळे का लागतात? बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात विशिष्ट अन्नाचे डोहाळे लागतात किंवा विशिष्ट पदार्थांच्या चवी आणि वास विशेष आवडायला लागतात. या सर्व सामान्य बाबी आहेत आणि थोडे दिवस टिकतात. हे बहुधा गरोदरपणात हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे घडत असावे.
अन्नाच्या डोहाळ्यांसाठी या साध्या टिपांचा वापर करा :
नैसर्गिक मसाले खा
गरोदर स्त्रियांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होणे हे अनैसर्गिक नाही; मात्र, पचनाच्या समस्या होऊ नयेत यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात नैसर्गिक मसाल्यांचा समावेश करू शकता.
ग्रीन टी प्या
ग्रीन टीमुळे अन्नाचे डोहाळे कमी होऊ शकतात. ग्रीन टी हे प्रक्रिया न केलेल्या पानांपासून तयार केला जातो आणि त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रभावी अँटी-ऑक्सिडंट्स असल्याचे सांगितले जाते. त्यांना पॉलीफेनॉल असे म्हणतात.
बी व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स किंवा बी व्हिटॅमिन घ्या
गरोदरपणात डोहाळे दाबून टाकण्यासाठी आणि तुमचा स्टॅमिना कायम राखण्यासाठी, तुम्ही जीवनसत्वांचा विचार करू शकता, अधिक विशेष करून बी-व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स (बी व्हिटॅमिन). कार्बोहायड्रेटचे चयापचय होऊन त्याचे अगदी सरळ शुगर ग्लुकोजमध्ये रुपांतर होण्यासाठी हे महत्त्वाचे असतात. बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन हे मांस, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या, तांदूळ, दूध, अंडी, मांस, मासे आणि संपूर्ण तृणधान्ये, फळे यामध्ये आढळते.
गरोदरपणात सोया मिल्क प्या.
सोया मिल्क हे तुमचे ओटमील किंवा ब्रेकफास्टला उत्तम पूरक अन्न असते आणि त्यामधील अतिरिक्त कॅल्शियममुळे तुमचे दात, नखे आणि हाडे मजबूत होतील. कॅल्शियममुळे आईसक्रीमच्या डोहाळ्यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचे डोहाळे कमी होण्यात मदत होते.
कृत्रिम स्वीटनर टाळा
यामुळे डोहाळ्याची व्याप्ती वाढू शकते आणि अनेक डाएट पदार्थांमध्ये याचा समावेश असतो. तुम्हाला हवेच असेल तर नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने प्रक्रिया केलेले पदार्थ खा.
एनर्जी बुस्टरचे प्रमाण कमी करा
कॅफेनमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा आणि उत्साह “परत मिळतो” असे मानले जाते आणि ते कधीकधी आवश्यक असू शकते. कॅफेनचा दुष्परिणाम असा की, त्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते, विशेषतः तुमच्या रक्तातील साखरेची पातळी असंतुलित झाली तर. त्याऐवजी तुम्ही ग्रीन टीसारखे हर्बल टी पिऊ शकता आणि भरपरू द्रवपदार्थ पिण्याची सवयही लावून घेऊ शकता, जसे की पाणी, शहाळ्याचे पाणी, लस्सी, इत्यादी.
शिजवलेले अन्न खा! प्रक्रिया केलेले अन्न टाळा
किरकोळ पोषणमूल्ये देणारे प्रक्रिया केलेले अन्न टाळा. निरोगी पदार्थांमध्ये बऱ्याचदा घरी तयार केलेल्या ताज्या अन्नाचा समावेश होतो.
गरोदरपणात डोहाळे कमी करण्याचे हे काही नैसर्गिक मार्ग आहेत. लक्षात ठेवा, गरोदरपणातील डोहाळ्यांमुळे तुमच्या आहारात काही असंतुलन होत नसेल तर डोहाळे ही काही गंभीर समस्या नाही. डोहाळ्यांमुळे तुम्ही सकस आहाराऐवजी निकृष्ट आहार (जंक फूड) घेणार नाही याची खबरदारी घ्या. न्याहारी न चुकवण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुमचे खाण्याचे डोहाळे आणखी तीव्र होतील.
तुमचे गरोदरपण पुढे जाईल तसे तुमचे खाण्याचे डोहाळे कमी होत जातील त्यामुळे धीर धरा. ते गेले नाहीत तरी चिंता करू नका, फक्त तुम्ही काय खाता त्यावर लक्ष ठेवा, सकस आहार घ्या.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews