Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Essential Pregnancy Nutrients - Folic Acid

गरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – फॉलिक अॅसिड

(0 reviews)

गरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.

Monday, December 18th, 2017

तर तुम्ही तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी काय खाण्याची गरज असते – आणि का?

 

पोषणमूल्य

फॉलिक अॅसिड (किंवा फोलेट)

तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्याची गरज का असते?

तुम्ही गरोदर होण्यासाठी नियोजन करत असाल किंवा गरोदर असाल तर तुम्ही फॉलिक अॅसिडचे सेवन वाढवले पाहिजे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या बाळाचा निरोगी विकास होण्यासाठी फॉलिस अॅसिड अत्यावश्यक असते. बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी ते विशेष महत्त्वाचे असते.

तुम्ही हे खा, जेणेकरून...

  • स्पायना बायफिडा सारखे मज्जासंस्थेच्या नलिकेच्या दोषांना प्रतिबंध होतो – या दोषामुळे बाळाचा कणा पूर्णपणे एकत्र सांधत नाही आणि त्यामुळे अनेक प्रकारचे गंभीर अंपगत्व येऊ शकते.

किती पुरेसे असते?

तुम्ही आहारातून रोज 600 मिग्रॅ फोलेट घेतले पाहिजे.
तुम्ही नैसर्गिकरित्या फोलेट असलेले अन्नपदार्थ खाऊन (आहाराद्वारे) हे साध्य करू शकता. तुमच्या आहारातून तुमची आणि तुमच्या बाळाची फोलिक अॅसिडची गरज पूर्ण होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुमही तुमचे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

तुमच्या थाळीत

  • ब्रेड (ऑस्ट्रेलियातील बहुतांश ब्रेडमध्ये फोलेट टाकलेले असते);
  • संत्री;
  • हिरव्या पालेभाज्या
  • फोलेटने समृद्ध तृणधान्य;
  • फोलेट टाकलेले फळांचे रस;
  • शेंगा;
  • सुका मेवा
  • यीस्टचे सार (उदा. वेजिमाईट)

टिपा

  • अन्न अति शिजवल्यामुळे त्यात असलेले फोलिक अॅसिड नष्ट होऊ शकते किंवा कमी होऊ शकते, त्यामुळे तुमच्या भाज्या शिजवताना काळजी घ्या.

 

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.