Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Essential Pregnancy Nutrients - Essential Fatty Acids

गरोदरपणातील आवश्यक पोषण – आवश्यक फॅटी अॅसिड

(0 reviews)

गरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.

Tuesday, December 19th, 2017

तर तुम्ही तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी काय खाण्याची गरज असते – आणि का?

 

पोषणमूल्य

आवश्यक फॅटी अॅसिड

तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्याची गरज का असते?

याला चांगले ‘स्निग्ध पदार्थ’ असेही म्हणतात, डीएचए हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि एआरए हे ओमेगा-6 फॅटी अॅसिड हे आवश्यक फॅटी अॅसिड आहेत, ते तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासामध्ये योगदान देतात. तुमचे शरीर त्याची निर्मिती करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही जे अन्न घेता त्यातून ते दिले जाण्याची गरज असते.

तुम्ही हे खा, जेणेकरून...

 • तुमच्या बाळाचा मेंदू तयार होण्यात मदत होते (डीएचए आणि एआरए)
 • तुमच्या बाळाच्या डोळ्याच्या विकासात मदत होते (डीएचए आणि एआरए)

किती पुरेसे असते?

गरोदरपणात एका दिवसाला 115 मिग्रॅ

तुमच्या थाळीत

ओमेगा-3 फॅटी अॅसिड खालील पदार्थांमध्ये आढळते :

 • चरबी असलेले मासे (मॅकेरेल, सार्डिन, टुना, सॅलमोन);
 • कॅनोला आणि सोया तेले;
 • कॅनेलापासून तयार केलेले मार्गारिन.

ओमेगा-6 फॅटी अॅसिड खालील पदार्थांमध्ये आढळते :

 • अंडी;
 • लोणी;
 • प्राण्यांची चरबी;
 • सुका मेवा आणि बिया;
 • वनस्पती तेले जसे की मका, सोया, सूर्यफूल आणि करडई.

टिपा

 • तुम्हाला चांगले ओमेगा-६/ओमेगा-३ संतुलन मिळण्याची खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फॅटी फिश खा आणि तुमच्या सॅलडबरोबर वनस्पती किंवा सुका मेव्याचे तेल वापरा.
 • खाण्यासाठी सार्डिन, मॅकेरेल आणि हरिंग यांच्यासारखे लहान, फॅटी फिशची निवड करा. त्यांच्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता कमी असते, पारा तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकतो.
 • तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आवश्यक असणारे पोषणमूल्ये तुमच्या आहारातून मिळत नसल्याची चिंता तुम्हाला वाटत असेल तर आहारतज्ज्ञशी चर्चा करा.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

 • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
 • toolTry our tailored practical tools
 • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Search

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.