1. तुम्हाला घट्ट आधार देणारी आणि व्यवस्थित बसणारी ब्रा परिधान करा. तुमच्या ब्रामुळे तुमच्या स्तनाग्रांना काही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. कृत्रिम धाग्यांच्या ब्राऐवजी सुती ब्रा वापरा, कारण त्या अधिक आरामदायी असतात.
तर तुमची ब्रा तुम्हाला व्यवस्थित बसते हे तुम्हाला माहिती असेल :
• ती फार घट्ट किंवा खूप सैल नाही हे तुम्हाला जाणवते
• ब्रामध्ये संपूर्ण स्तन बसतो, खालून, वरून किंवा बाजूने बाहेर येत नाही.
2. मॅटर्निटी ब्रा वापरून बघा, त्या अधिक आधार देतात. अशा ब्रामध्ये साधारणपणे अधिकचे हुक असतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरातील बदलानुसार त्याचे आकारमान बदला येते. आराम आणि अधिकचा आधार यामुळे झोपताना स्त्रिया मोठ्या प्रमाणात मॅटर्निटी ब्रांना प्राधान्य देतात.
3. तुमच्या स्तनांमधून स्राव होत असेल तर विल्हेवाट लावता येण्याजोगे किंवा धुण्याजोगे ब्रेस्ट पॅड हा चांगला पर्याय असतो. अधिक चांगला वापर होण्यासाठी, काही वेळा दररोज आंघोळीपूर्वी आणि नंतर तुमचे स्तन हवेत सुकवा.
4. शेवटचे पण कमी महत्त्वाचे नाही; तुमचे स्तनाग्रे आणि स्तनाग्रांभोवतीच्या गडद भागावर साबण लावणे टाळा कारण साबणामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.
ही सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुम्हाला अवघडलेपणा किंवा वेदना जाणवत असतील तर, तुमच्या डॉक्टरांशी बोलायचा विचार करा. गरोदरपणात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही स्वतःहून औषधे घेऊ नका.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
1 review
24/02/2018 - 11:24am
Compurx
Prescription Pad is a clinic management software provides all types of facilities for hospitals & doctors. The best part of the software is Prescription writing facilities for doctors & drug & brand interaction checker tool. For more info please visit: http://www.prescriptionpad.in
0 out of 0 people found this review helpful