गरोदरपणाच्या उत्तम सुरुवातासाठी आणि पुढील प्रगतीसाठी, गरोदर राहण्यापूर्वी तुमच्या पोषणाचा स्तर महत्त्वाचा असतो. तुमच्या पोषणाचा स्तर उंचावून तुम्ही खालील बाबतीत तुमच्या संधी वाढवू शकता :
वजन अति कमी किंवा अति जास्त असेल तर तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यता कमी होतात. हुशारीने आहार घेऊन आणि नियमित व्यायाम करून निरोगी वजन मिळवा.
- चांगली जननक्षमता
- सहज गर्भधारणा
- बाळाचा योग्य विकास
निरोगी वजनासाठी सुरुवात करा
तुमचे वजन कमी असेल तर तुमच्या शरीरातील ऊर्जेचा साठाही अपुरी असेल. यामुळे अंडाशयातून अंडे किंवा अंडी बाहेर टाकण्याची प्रक्रिया, मासिक पाळी यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते. तुमचे वजन अति कमी असतानाच तुम्ही गरोदर राहिलात तर तुम्हाला नंतर वजन वाढवणे आव्हानात्मक वाटू शकते.
तुमचे वजन जास्त असेल तर, तर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली असेल. अतिरिक्त साठवलेल्या चरबीमुळे, अतिरिक्त पुरुषलिंगी हार्मोन आणि इन्शुनिलनच्या असंवेदनशीलतेमुळे अंडाशयातून अंडे किंवा अंडी बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीमुळे तुमच्या गर्भधारणेच्या शक्यता कमी होऊ शकतात. इतकेच नाही तर अति वजन असल्यामुळे गर्भधारणेदरम्यान मधुमेह होण्याचा, उच्च रक्तदाब होण्याचा धोका असतो आणि कमी वजनाचे/मुदतीपूर्व बाळ जन्माला येण्याची शक्यता असते.
आहार आणि जननक्षमता
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, तुमच्या पोषण स्तराचा गरोदरपणातील निरनिराळ्या महत्त्वाच्या टप्प्यांवर परिणाम होऊ शकते, त्यामध्ये जननक्षमता, गर्भधारणा, रोपण आणि तुमच्या बाळाचे अवयव निर्माण होण्याचा समावेश आहे.
गरोदर राहण्यासाठी कोणताही विशेष आहार नसला तरी, मोठ्या प्रमाणात संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, 24-42 वयोगटातील, खालील प्रकारे आहार घेणाऱ्या स्त्रियांमध्ये उच्च जननक्षमता आढळते :
- ट्रान्स फॅटचे कमी सेवन आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक सेवन
- प्राणिज प्रथिनांचे (अंडी, चिकन आणि मांस) कमी सेवन आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचे (डाळी, शेंगा आणि सोयाबीन) उच्च सेवन
- अधिक चोथा असलेले अन्नपदार्थ
- हाय-फॅट दुग्धजन्य पदार्थांना प्राधान्य
- वनस्पतींमधून मिळणारे उच्च बिगर-हेम लोह
ट्रान्स फॅट आणि प्राणिज प्रथिनांमुळे अंडी निर्माण करण्याच्या समस्येमुळे वंध्यत्वाची समस्या येते. तुम्हाला अंडाशयातून अंडे किंवा अंडी बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये समस्या असेल तर हे पदार्थ तुमच्या आहारात घेऊ नका.
फॉलिक अॅसिडचा पुरवठा आहार सुरू करा
फॉलिक अॅसिडचा (बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्व) पुरवठा आहार लवकरात लवकर सुरू करण्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. कारण तुम्ही गर्भधारणेपूर्वी किंवा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात फॉलिक अॅसिड सेवन केले तर ते तुमच्या बाळाच्या मज्जासंस्था नलिकेमध्ये दोष (मेंदूतील आणि पाठीच्या कण्यातील दोष) निर्माण होण्याचा धोका 70 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात.
इतर पोषणमूल्ये विसरू नका
गर्भधारणा आणि गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळासाठी महत्त्वाचे असल्याचे दाखवलेले इतर पोषणमूल्ये आहेत बी12, बी6, ए, लोह, तांबे, जस्त, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि डी जीवनसत्व.
निरनिराळे अन्नपदार्थ असलेल्या संतुलित आहारामुळे तुम्हाला हे पोषणमूल्ये मिळण्यात मदत होत असली तरी, तुम्हाला पोषणमूल्यांचा पुरवठा सुरू करण्याची गरज आहे का ते तपासून पाहण्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सक्रिय व्हा
शारिरीकपणे सक्रिय राहिल्यास तुम्हाला निरोगी वजन साध्य करण्यात मदत होते आणि निरोगी वजनामुळे तुमच्या निरोगी गरोदरपणाची आणि निरोगी बाळाची शक्यता वाढते.
वाचायला वेळ लागत आहे? पण यातील प्रत्येक शब्द तुम्हाला निरोगी मातृत्वासाठी महत्त्वाचा आहे! तुम्हाला शुभेच्छा!!
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews