Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
 Pregnancy and Your Body

गरोदरपणा आणि तुमचे शरीर

(0 reviews)

गरोदरपणामुळे तुमच्या शरीरात इतके झपाट्याने बदल होतात की ज्या पद्धतीने तुमचे शरीर बदलत आहे याबद्दल तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटत राहते. तुम्ही तुमचे दिसणे, तुमच्या शरीराचे वजन, तुमची सतत वाढणारी कंबर, स्तन, आणि अगदी तुमच्या कपड्यांचे आकारमान याबद्दल अधिकाधिक विचार करू लागता! गरोदरपणानंतर तुमच्या शरीरयष्टीचे काय होणार आहे याबद्दलही तुम्ही विचार करू लागता.

Thursday, December 14th, 2017

तुमच्या शरीरात होणारे बदल नैसर्गिक आहेतगरोदरपणात होणारे हे बदल सामान्य आहेत. हे तथ्य स्वीकारा आणि तुमच्या जोडीदारालाही ते स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुमचे वाढणारे वजन आणि तुमचे शरीर हा तुम्हा दोघांसाठीही आनंदाचा विषय असला पाहिजे.

गरोदरपण म्हणजे अहोभाग्य एक नवीन मानवी जीव शरीरात बाळगण्याचा आणि तो या पृथ्वीतलावर आणण्याचे अहोभाग्य आणि क्षमता तुम्हाला लाभली आहे. याचा आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगा.

गरोदरपणामुळे तुम्ही आणखी छान दिसता : गरोदरपणामध्ये तुमच्या शरीरात होणार्या बदलामुळे तुमच्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात. वास्तविक पाहता, अगदी गरोदरपणातसुद्धा, योग्य व्यायाम आणि निरोगी, संतुलित आहाराच्या मदतीने तुम्ही काही प्रमाणात तुमच्या शरीराचा नैसर्गिक आकार टिकवून ठेवू शकता. तरीही, असे काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरामदायी कपड्यांमुळे फरक पडतो : तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला छान वाटण्याचा एक मार्ग म्हणजे खास गरोदरपणासाठी असलेले आरामदायी कपडे वापरणे. त्यामुळे तुम्हाला शारिरीकदृष्ट्या आरामदायी वाटते आणि तुमचे सौंदर्यही खुलवते.
गरोदरपणाच्या आहाराचे फायदे.
तुम्हाला चांगले वाटण्यामध्ये अन्न हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो. पोषक आहारामुळे तुम्ही शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहता, त्याशिवाय तुमची त्वचाही अधिक चांगली होती. गरोदरपणात सकस आहाराच्या फायद्यांची खालीलप्रमाणे यादी करता येईल :
चमकती त्वचा :जीवनसत्व अ आणि ई यांनी समृद्ध असलेल्या आहारामुळे तुमच्या त्वचेमध्ये सुधारणा होते. वाढत्या प्रमाणात द्रव आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी कमी होत नाही आणि तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, त्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. जीवनसत्व क हे कोलाजेन आणि अँटीऑक्सिडंट्सचा अविभाज्य भाग असते, त्याचा तुमच्या त्वचेला लाभ होतो.

त्वचा मऊ होते आवश्यक फॅटी अॅसिड आणि अमायनो अॅसिड यांच्यासह तुमच्या आहारातील जीवनसत्व अ आणि ई तुमच्या एपिथिलियल ऊती अधिक चांगल्या होतात – त्यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ होते.

अधिक चांगले, निरोगी केस आवश्यक स्थूल (मॅक्रो) आणि सूक्ष्म पोषकमूल्यांनी समृद्ध असलेल्या आहारामुळे, तुमचे केस घनदाट, निरोगी आणि चमकदार होतात.

गरोदरपणातील आहार पुढील गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी पुरेसे असला पाहिजे अ) आईचे आरोग्य कायम राखण्यासाठी ब) वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क) प्रसूतीकळांदरम्यान आवश्यक ताकद आणि जोम यासाठी ड) यशस्वीपणे दूध येण्यासाठी.

गरोदरपणातील आहार हा हलका, पोषक, सहज पचण्याजोगा आणि प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्व यांनी समृद्ध असला पाहिजे.

तुमचे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाने सांगितल्यानुसार योग्य आहार घ्या. सामान्यपणे आनंदी राहा, चिंता करू नका. तुमचे शरीर हे अष्टपैलू असते. आता ते आतील बाळाला सामावून घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहे. गरोदरपणानंतर, ते लवकरच पूर्वीच्या आकारात परत येणार आहे.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.