जर तुम्ही मातृत्वाच्या उंबरठ्यावर असाल आणि तुमचे स्वतःची कारकीर्दही असेल तर तुम्हाला तुमच्या गरोदरपणातही कामाच्या जागेपासून दूर राहणे कठीण वाटू शकते. कधीकधी आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला कामामधून तुम्हाला हवे असेल तरी मोठी सुटी घेणे शक्य होत नाही. गर्भवती स्त्रियांसाठी कामाचे वातावरण नेहमीच सुरक्षित आणि आरामदायी नसते. किरणोत्सर्गांशी संपर्क, संसर्ग आणि कामाचे दीर्घ किंवा उशीरापर्यंतचे तास यामुळे तुमच्या आरोग्यावर हानीकारक असू शकते.
तुमच्या गरोदरपणाचे बरेच आधी नियोजन करा.
तुमचे गरोदरपण सुरक्षित, स्वस्थ आणि निरोगी राखण्यासाठी तुम्ही काही महिने आधी तरी नियोजन केले पाहिजे हे सांगायची गरज नाही. आणि तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपायांचे पालन करा.
तुमच्या कामाच्या वेळापत्रकाचे नियोजन करा, ताण दूर ठेवा. कामाच्या ठिकाणी असलेल्या दबावाचे आणि वाढत्या गरोदरपणाच्या वाढत्या मागण्यांचे नियोजन हा नेहमीच शहाणपणाचा मार्ग असतो. गरोदरपणाच्या गरजा आणि प्रसूतीसाठी असलेल्या तुमच्या रजांमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ नये यासाठी आधीच नियोजन करा. शक्य झाले तर, तुमच्या गरोदरपणाचे अशा पद्धतीने नियोजन करा की, बढती, पगारवाढ आणि रजांचे मूल्यमापन हे करताना तुमची आवश्यक कार्यक्षमता तुम्हाला दाखवता येईल.
हाती असलेल्या प्रकल्पांसाठी व्यवस्था करा. तुमच्या गैरहजेरीत तुमची कामे पूर्ण होण्यासाठी व्यवस्था करणे हे एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून तुमचे हे कर्तव्य आहे. येऊ घातलेले काही प्रकल्प असतील तर ते पुढे सुरू राहण्यासाठी तुम्ही उपाय सुचवू शकता. जरी तुम्हाला तुमच्या मातृत्वाच्या रजा आधीच ठरवता येत असल्या तरी तिसऱ्या तिमाहीमध्ये अनपेक्षित परिस्थिती किंवा गुंतागुंतींमुळे गोष्टी अधिक अनिश्चित होतात.
तुमच्या आजारपणाच्या रजा साठवून ठेवा. एक उपाय म्हणजे तुमच्या आजारपणाच्या रजा प्रसूतीसाठी राखून ठेवणे. मात्र अति काम करून तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही स्वतःवर ताण घ्यावा असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही अगदी सुरुवातीपासून तुमच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कामामधून अधूनमधून सुटी घेतल्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटत राहते.
तुमच्या गैरहजेरीमध्ये पर्यायी कर्मचाऱ्याची व्यवस्था करा. एक जबाबदार कर्मचारी म्हणून, तुम्ही एखाद्या पर्यायी कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्याचा आणि त्याला योग्य प्रशिक्षण देण्याचा विचार करू शकता, जेणेकरून तो कर्मचारी सहजपणे काम हाती घेऊ शकतो आणि ते पूर्ण करू शकतो. यामुळे तुम्हाला कोणत्याही चिंता न करता आणि कामाकडे दुर्लक्ष केल्याचा अपराधभाव न बाळगता तुमच्या रजा खर्च करता येतील.
तुमचे डॉक्टर तुम्हाला नियोजनासाठी मदत करू शकतात. सर्वात महत्त्वाचे, तुमचे डॉक्टर हे तुमच्यासाठी सर्वोत्तम नियोजक असतात. तुमच्या कामाचा प्रकार, मागण्या स्पष्ट करून सांगा आणि तुमच्यासाठी त्याचा ताण कमी व्हावा यासाठी कामाच्या वेळापत्रकाचे नियोजन कसे करावे याबाबत तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्या.
कामाच्या ठिकाणी गरोदरपण जाहीर करताना संकोच बाळगू नका.
अनेक स्त्रियांना कामाच्या ठिकाणी त्यांचे गरोदरपण जाहीर करणे कठीण जाते. बॉस आणि सहकाऱ्यांची प्रतिक्रिया काय असतील या विचारामुळे ती ‘चांगली बातमी’ जाहीर करण्यात अनेकींना संकोच वाटतो.
तुमचे गरोदरपण जाहीर करण्यासंबंधी शहाणपणाने निर्णय घ्या. ही बातमी जाहीर करण्यापूर्वी काही काळ वाट पाहणे हे सूज्ञपणाचे आहे असे काही जण सुचवतील. तुमचे गरोदरपण जाहीर करावे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला गोंधळात टाकणारे अनेक घटक असतात. गर्भपाताची भीती आणि काही कामे तुमच्यावर सोपवण्यासाठी तुमचे बॉस आणि सहकारी तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता अशा काही गोष्टींमुळे तुम्हाला हे जाहीर करणे नको वाटत असेल. त्याशिवाय, तुम्हाला पगारवाढ किंवा बढतीची अपेक्षा असेल तर, तुमचे गरोदरपण जाहीर केल्यामुळे तुमच्यावर डाव उलटू शकतो.
स्वतःची बाजू सुरक्षित करण्यासाठी जाहीर करा. काही विशिष्ट कारणांमुळे गरोदर स्त्रिया कामाच्या ठिकाणी स्वतःचे गरोदरपण जाहीर करण्यासाठी डिवचल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी असलेल्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित आणि आरामदायी ठेवण्यासाठी तुमच्या वरिष्ठांना तुमच्या शारिरीक स्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या बॉसला इतर कोणाकडून कळू नये अशी तुमची इच्छा असू शकते. त्याशिवाय मळमळ व उलट्या यासारखे त्रास आणि तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल यामुळे तुमचे तथ्य उघड होईल आणि त्यामुळे तुम्हाला शरमल्यासारखे वाटू शकेल.
लवकर जाहीर केल्यामुळे तुमच्या कामाचा ताण कमी होऊ शकतो. गरोदरपण लवकर जाहीर करण्याचे काही फायदे आहेत, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आधार आणि गरज पडेल तेव्हा तुमच्या वरिष्ठांची मदत मिळते, त्यामुळे तुमचे जगणे सोपे होते. तुमच्यावर कामाचे ओझे लादले जात नाही आणि तुम्हाला गरज असेल तेवढी विश्रांती तुम्ही घेऊ शकता. तुमच्या एचआर व्यवस्थापकांशी संपर्क साधून, तुमची कंपनी देऊ करत असलेल्या लाभांची माहिती मिळवणे योग्य ठरते. तुम्ही काम आणि गरोदरपण यांच्याबाबतीत तुमची कर्तव्ये चोखपणे पार पाडण्यात सक्षम आहात याबद्दल तुमच्या नियोक्त्यांचे मन वळवा.
अवघडलेपणामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका.
काम करणाऱ्या अनेक गरोदर स्त्रियांना विशिष्ट अवघडलेपणा जाणवतो, त्यामुळे त्यांची कामातील सक्रियता कमी होते. कामाच्या ठिकाणी अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.
मळमळ वाढेल अशी परिस्थिती टाळा. गरोदरपणात मळमळ आणि उलट्या यांचा आयांना सर्वात जास्त त्रास होतो. मळमळीची भावना टाळण्यासाठी, मळमळ होईल अशी ठिकाणे आणि वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा, जसे की अस्वच्छ जागा, तीव्र गंधाचे पदार्थ, इत्यादी. अधूनमधून लागणारी भूक भागवण्यासाठी सुक्या मेव्यासारखे निरोगी फराळाचे पदार्थ जवळ बाळगा. दिवसभरात 3 वेळा भरपेट खाण्याऐवजी 5 वेळा थोडे थोडे जेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या (दिवसातून कमीत कमी 2 लीटर). पाण्यामुळे तुमची पचनसंस्था स्वच्छ होते आणि ताणाची पातळी कमी होते. दिवसभरात तुम्ही ताजी फळे आणि भाज्यांचे रस, शेक, ताक, इत्यादींचेही सेवन करू शकता. बैठकीच्या वेळी दाराजवळ बसणे योग्य, कारण तुम्हाला उलटी आल्यासारखे वाटले तर तातडीने बाहेर निघता आले पाहिजे.
शीणवटा पळवून लावण्यासाठी वारंवार विश्रांती घ्या. कामाच्या ठिकाणी थकवा हा खरा अडथळा असू शकतो. कधीही थकवा आला तरी तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे हे. तुमच्या डेस्कवर किंवा ऑफिसमधील सिक रुममध्ये लहानशी डुलकी काढणे हा शीणवटा घालवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ते शक्य नसेल तर, थोडा वेळ डोळे बंद करा आणि तुमचे हात व पाय थोडेसे ताणा. लहानशी फेरी मारली तरी बरे वाटू शकते. तुम्ही वाहन चालवत कामाच्या ठिकाणी जात असाल तर तुमचे काम सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ विश्रांती घेण्याचा विचार करू शकता. लांबवर वाहन चालवणे टाळा आणि शक्य असेल तर वाहनचालक ठेवा.
तुमची पाठ आरामदायी ठेवा. गरोदरपणामध्ये पाठ दुखणे ही सामान्य समस्या असते, विशेषतः शेवटच्या टप्प्यामध्ये. तुम्ही दिवसभर एकाच जागी बसून असण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही स्वतःला आरामात ठेवले पाहिजे. त्यामुळे स्वतःसाठी सरळ पाठीची आणि वाकवता येण्याजोगी खुर्ची निवडा, जेणेकरून तुमच्या पाठीवर दबाव असेल तर तो सैल करता येईल. तुमच्या पाठीला हात आणि पाय ठेवायची जागा असेल याची खातरजमा करून घ्या. वारंवार छोट्या फेऱ्या मारायला विसरू नका.
आरामदायी कपड्यांनाच पसंती असते. सैल आणि अगदी आरामदायी असणारे कपडेच वापरा. बुटांऐवजी स्नीकरना पसंती द्या. किंवा प्रवास करताना तुम्ही ते बदलू शकता. गरोदरपणात सुती आणि लिननचे कपडे सर्वाधिक आरामदायी असतात.
प्रवास कमी करा. गरोदरपणात प्रवासाचा ताण तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला घरून काम करू द्यावे यासाठी वरिष्ठांचे मन वळवा. तुम्ही रहदारी सुरू होण्यापूर्वी ऑफिससाठी प्रवास करण्याचा विचार करू शकता. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांनीही सहप्रवाशांचे कोपऱ्यांचे धक्के लागू नयेत यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे.
पुढे काय आहे त्याचे नियोजन केल्यास ताण कमी होण्यास मदत होते. नियोजन केल्यामुळे आणि प्राधान्यक्रम ठरवल्यामुळे ताण कमी करण्यास मदत होते. आगामी आठवडा किंवा महिन्यासाठी तुमच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सहकाऱ्यांना परिस्थिती समजावून सांगा आणि गरज पडेल तशी त्यांची मदत घ्या. तुमच्यावर कामाचे अतिरिक्त ओझे असेल तर तसे स्पष्टपणे पण नम्रपणे तुमच्या वरिष्ठांना सांगा. स्वतःचा ताण घालवण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा स्वीकार करा.
आजच्या काळात, आयांसाठी कारकीर्द हे स्वतःपासून वेगळे न करता येण्याजोगे सत्य आहे. पण गरोदरपण हे त्याहून मोठे सत्य आहे आणि निरंतर कालापासून राहिले आहे. गरोदरपणा आणि व्यवसाय एकमेकांशी जुळवून घेणे आणि दोन्ही गोष्टी सुरळीतपणे पार पडण्यासाठी मार्ग शोधणे यातच सूज्ञपणा आहे. गरोदर स्त्रियांसाठी पुढील काळासाठी काही महत्त्वाची तथ्ये आहेत. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय ते माहिती करून घ्या आणि तुम्ही नेहमीच एक उत्तम आई आणि एक उत्तम व्यावसायिक व्हाल, तेही एकाच वेळी.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
1 review
24/02/2018 - 11:26am
Compurx
Prescription Pad is a clinic management software provides all types of facilities for hospitals & doctors. The best part of the software is Prescription writing facilities for doctors & drug & brand interaction checker tool. For more info please visit: http://www.prescriptionpad.in
0 out of 0 people found this review helpful