हे कधी होते?
गर्भपाताचे बहुतांशी प्रमाण गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात असते. गर्भधारणेनंतर 12 आठवड्यांनी गर्भपात होण्याचे प्रमाण फक्त 1-2 टक्के असते.
मला पुन्हा गर्भधारणा होऊ शकते का?
नक्कीच. सर्वसाधारणपणे तुमचे डॉक्टर तुम्हाला पुन्हा गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी 2-3 महिने वाट बघायला सुचवू शकतात. हा कालावधी तुमच्या मनाला सावरण्यासाठी वापरा, तसेच दुसऱ्या बाळासाठी गर्भधारणा आणि प्रसूती यासाठी तुमच्या शरीराची तयारी करण्यासाठीही हा काळ वापरा.
या खेपेस मला किती संधी आहे?
तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि जीवनशैलीत या काही सामान्य मार्गदर्शक गोष्टींचे पालन केले तर गर्भपातानंतर गर्भधारणेचची शक्यता जास्त असते :
1. तुमच्या रोजच्या वेळापत्रकात 30 मिनिटे व्यायामासाठी द्या.
2. सर्व स्थूल आणि सूक्ष्म पोषणमूल्यांचा समावेश असलेला आणि सर्व अन्नगट असलेला सकस, संतुलित आहार घ्या.
3. तुमच्या तणावाची पातळी कमी करा.
4. शेवटी, दारू आणि धूम्रपानासारख्या मादक पदार्थांपासून दूर राहा.
माझे डॉक्टर मला कोणता सल्ला देतील?
भूतकाळात तुमचा गर्भपात झाला असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाउंड स्कॅन करण्याचा सल्ला देतील.
तुमचे वारंवार गर्भपात झाले असतील तर तुमचे डॉक्टर तुम्ही आणि तुमचा जोडीदार या दोघांच्याही काही विस्तृत चाचण्या आणि तपासण्या करू शकतील. एकदा समस्येचे निदान झाले की, पुन्हा गर्भधारणा होणे अवघड नसते. फक्त तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे पालन करत राहण्याची खबरदारी घ्या.
तुम्हाला पुन्हा आश्वस्त करण्यासाठी सांगतो, घाबरू नका. गर्भपात दुर्दैवी आहे पण त्यामुळे तुम्ही जीवनाला पुन्हा संधी देण्यापासून स्वतःला अडवू नये.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews