जेव्हा तुम्ही गर्भवती होण्याची योजना आखत असाल तेंव्हा कधीकधी छोट्या गोष्टींचा विचार करणे, याबद्दल उत्सुक, चिंतित होणे किंवा काळजी करणे हे नैसर्गिक आहे. तथापि, तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास असमर्थ आहात, उदासीन वाटत असल्यास आणि यामुळे तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम होत असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दररोजचे स्वतःसाठी दिवसाची 15 मिनिटे काढणे, चालायला जाणे किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलणे इत्यादी तुमच्या जीवनात ताण कमी करण्यास मदत करू शकते.
गरोदरपणाच्या आधी असलेल्या मानसिक आरोग्यविषयक समस्या तुम्हाला गर्भधारणेदरम्यान किंवा जन्मानंतर पहिल्या वर्षात अधिक असुरक्षित बनवू शकतात.
तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यास मदत करु शकणार्या गोष्टी
तुमची एक निरोगी दैनंदिन दिनचर्या आहे याची खात्री करा. काही गोष्टी केल्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
स्वतःवर प्रेम करा
स्वतःवर प्रेम करणे आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे.
तुमच्या शरीराचे पोषण करा
संतुलित आहार घेण्यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढते, तुमची मनःस्थिती वाढते आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होते.
सक्रीय रहा
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे एक वास्तविक ताणनाशक असू शकते. तुम्हाला त्यासाठी व्यायामशाळेत जाण्याची गरज नाही. बागकाम, नृत्य यासारख्या क्रिया शारीरिक हालचालींतर्गत येतात. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या क्रियाशील असता तेव्हा तुमचे शरीर इंडोर्फिन्स नावाचे हार्मोन 'चांगले वाटण्याची जाणीव करणारे हार्मोन' निर्माण करते, जे तणाव दूर करण्यास आणि तुमच्या मनाची स्थिती सुधारण्यास मदत करू शकते.
झोपेतून सौंदर्य प्राप्त करा
पुरेशी झोप आणि योग्य आराम घेणे: तुम्हाला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि योग्य ठेवण्यासाठी चांगली झोप महत्त्वाची आहे. तुम्हाला झोपण्यात अडचणी येत असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा.
ताण व्यवस्थित हाताळा
चित्रकला, पुस्तक वाचणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या तुमच्या आवडत्या छंदाचा स्वैर आनंद मिळवण्यासाठी तुमच्या व्यस्त कार्यक्रमामधून काही वेळ काढा. ताण कमी करण्यास आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यास तुम्हाला मदत होईल.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews