व्यायामाने तुम्हाला तंदुरुस्त राहणे सोपे जाईल. पोटाचे व पेल्विक फ्लोअरचे व्यायाम हे गरोदरपणात करून बघावेत.
तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यायाम करू शकता ते तुमच्या डॉक्टरना विचारा आणि शक्य तितके अर्हताप्राप्त प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा.
पोटाचे व्यायाम
गरोदरपणात पोटाच्या व्यायामामुळे तुमच्या मणक्याला आधार देणारे पोटाचे स्नायू बळकट होतात. पाठीचे दुखणे कमी होण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.
पोटाचे व्यायाम करण्यासाठी:
गरोदरपण पुढे जाते तसे, तुमच्या ऊर्जेची पातळी मोठ्या प्रमाणात बदलू शकते. कोणत्याही घटनेत, व्यायाम करताना तुमच्या शरीराने तुम्हाला थांबायला सांगितले, तर कृपया ते ऐका आणि थांबा!
तुमची नाभी तुमच्या पाठीच्या कण्याकडे ओढून सुरुवात करा. हे करताना तुम्ही श्वास बाहेर सोडायचा आहे.
10 अंक मोजेपर्यंत त्या स्थितीत राहा आणि त्यानंतर विराम आणि मग श्वास आत घ्या.
दिवसातून 10 वेळा हा व्यायाम करा.
पोटाचे व्यायाम हे उभे राहून किंवा खाली बसूनही करता येतात. 2
पेल्विक फ्लोअर व्यायाम
पेल्विक फ्लोअर व्यायामांना “केगल व्यायाम” असेही म्हणतात, गुदाशय, योनी आणि मूत्रमार्ग यांच्यावर गरोदरपणात आणि नैसर्गिक प्रसूतीदरम्यान बराच ताण येतो, या अवयवांचे स्नायू बळकट करण्यासाठी केगल व्यायामाचा बराच उपयोग होतो. 1
केगल व्यायाम करण्यासाठी:
एकपासून तीन मोजेपर्यंत तुमचे पेल्विक फ्लोअर स्नायू आवळून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एक ते तीन मोजेपर्यंत सैल करा.
एका वेळी 10 ते 15 वेळा हा व्यायाम करा, अशा प्रकारे एका दिवसातून तीन वेळा हा व्यायाम करा.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये जमिनीवर पडून केगल व्यायाम करता येतात. कालांतराने तुमचे स्नायू बळकट होऊ लागतात त्यानुसार, तुम्ही बसून किंवा उभ्याने हे व्यायाम करू शकतात. मात्र, हे व्यायाम करताना आवळण्यासाठी योग्य स्नायू शोधणे हे आव्हान असते. चिंता करू नका, तुम्ही योग्य पेल्विक फ्लोअर स्नायू आवळून घेत आहात याची तुम्हाला खात्री पटेल, जर :
लघवी करताना तुम्ही ते आवळून धरले तर मूत्रविसर्जन थांबते.
मात्र, गरोदरपणात कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरशी बोला, कारण काही गरोदरपणात काही प्रकारचे व्यायाम टाळणे आवश्यक असते.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews