Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Steps to a Happy and Healthy Pregnancy

आनंदी आणि निरोगी गर्भावस्था करण्यासाठी पावले

(0 reviews)

गर्भधारणा हा तुमच्या आयुष्यातील सर्वात विस्मयकारक आणि उत्साहवर्धक टप्पा आहे.

Thursday, December 14th, 2017

आगाऊ नियोजन करून स्वतःसाठी आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही या टप्प्याला अधिक आरोग्यपूर्ण आणि अधिक परिपूर्ण करू शकता.

नियोजन कसे कराल.

1. निरोगी रहा.

निरोगी गर्भधारणेसाठी चांगले आरोग्य प्राप्त करणे आणि टिकविणे हे सर्वात महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली सोपी आहे. प्रथम, गर्भधारणेच्या सर्व प्रगतीशील टप्प्यामध्ये योग्य मार्गदर्शन देऊ शकेल अशा एका व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ते सोडून, तुम्ही तुमच्या स्वत: चे देखील इतर अनेक उपायांनी प्रयत्न करू शकता. उदाहरणार्थ:

निरोगी वजन मिळवा. योग्य वजनाद्वारे लठ्ठपणामुळे उद्भवणारी गुंतागुंत होण्याचा धोका कमी करता येतो.

रोगाचा  इतिहास. स्वत: ची  आणि तुमच्या साथीदाराची आणि दोन्ही कुटुंबाच्या  वैद्यकीय इतिहासाची  नोंद करा. तुमची चिंता वाढवणाऱ्या कोणत्याही गोष्टी आढळल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आरोग्यविषयक समस्या टाळा. तुम्हाला कोणतीही वर्तमान किंवा संभाव्य आरोग्य समस्या आढळल्यास, तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

2. तुमचा आहार व्यवस्थापित करा.

'तुम्ही जे खाता तसे होता' हे 'गर्भधारणेच्या बाबतीत विशेषतः सत्य आहे. तुम्ही आणि तुमचे बाळ, दोघांची सर्वोत्कृष्ट वाढ आणि विकासाला पोषक ठेवण्यासाठी योग्य पोषण महत्वपूर्ण आहे. गर्भधारणेदरम्यान, जेव्हा तुमच्या आवश्यकता वाढतात, एक संतुलित आहार तुमच्या बाळाच्या गरजेप्रमाणेच तुमच्याही गरजा पूर्ण करण्यास मदत करते. पौष्टिक पदार्थांच्या अपुरेपणामुळे गर्भधारणेदरम्यान विविध जोखमी आणि गुंतागुंती होऊ शकतात.

या उपाययोजना सुधाराच्या दिशेने तुम्ही पुढील पावले टाकू शकता:

पुरेसे पोषण: तुमच्यासाठी पौष्टिकदृष्ट्या पुरेसे आणि संतुलित आहार पथ्ये ठरवणे आणि ते निश्चित करण्यासाठी एका चांगल्या आहारतज्ञ / डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉलीक असिड, लोह, विटामिन ए, ई, सी आणि बी-ग्रुप सारखी जीवनसत्त्वे यांवर विशेष लक्ष द्यावे कारण ते गर्भधारणेदरम्यान महत्वाची भूमिका बजावतात.

पूरक अन्न: तुमचे डॉक्टर फॉलीक असिड, लोह, कॅल्शियम आणि बी गट विटामिनचे जन्मापुर्वी पूरक आहार लिहून देऊ शकतात. नियमितपणे या पूरक आहाराचे प्रमाणात सेवन आणि वेळापत्रक अनुसरण करण्याचा प्रयत्न करा.

द्रवपदार्थ सेवन: गर्भधारणेदरम्यान द्रवपदार्थाचे इष्टतम प्रमाणात सेवन आवश्यक आहे कारण हे पचनासाठी, पोषक द्रव्याच्या परिवहनासाठी  आणि वाढीसाठी मदत करते. तसेच, योग्य प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन निर्जलीकरण आणि संबंधित जोखमी रोखतात.

अति प्रमाणात साखर आणि मीठ टाळा: अति प्रमाणात साखर किंवा मिठाचे सेवन टाळा. हे तुम्हाला गर्भधारणे दरम्यान मधुमेह आणि उच्चरक्तदाबाची जोखीम ठरु शकते.

तुमचे कॅफे सेवन कमी करा: कॅफेन लघवीचे प्रमाण वाढवते आणि तुमच्या शरीरामधील पाणी नाहीसे होऊन शुष्क होऊ लागते. हिरव्या चहासारखी आरोग्यकारक पर्यायांची निवड करा जे तुम्हाला अँटीऑक्सिडेंटचा लाभ देते.

शांतचित्त राहा: मादक द्रव्य पूर्णपणे टाळा कारण ते तुमच्या शरीरावर विपरितपणे परिणाम करते आणि तुमच्या गर्भाला धोकाही ठरू शकते. परिणामी, तुमच्या बाळाला जन्मदोष आणि आकलनास अडथळे येऊ शकतात.

तंतुमय पदार्थ (फायबर) सेवन वाढवा: गर्भधारणा संबंधित  बद्धकोष्ठतेपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे आणि हळूहळू तुमचे तंतुमय पदार्थ सेवन वाढवा.

3. स्वच्छता.

तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे, तुमच्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवणे  आणि निरोगी अन्न स्वच्छता  विकसित करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण ते संक्रमण आणि इतर संभाव्य जोखीम रोखू शकतात.

दंत स्वच्छता: दातांची निगा अतिशय महत्वाची आहे. दंतवैद्यास तातडीने संपर्क साधला पाहिजे. यामुळे गरज पडल्यास दात काढणे किवा किडलेले दात भरणे दुस-या तिमाहीत करणे सुलभ होईल, जी अशी प्रक्रिया करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

अंघोळ: तुम्ही दररोज आंघोळ करावी पण असंतुलन झाल्यामुळे स्नानगृहात घसरण्यापासून सावध रहा.

अन्न स्वच्छता: याअंतर्गत तुमचे अन्न नीट विचारपूर्वक निवडण्याचा समावेश होतो. नेहमी निर्जंतुकीकृत उत्पादने निवडा. मऊ चीज सारखे पदार्थ टाळा. केवळ ताजे रस किंवा निर्जंतुकीकरण केलेले रस घ्या. जर तुम्हाला सॅलड्स किंवा मोड आलेल्या कडधान्याची इच्छा झाली तर ते घरी ताजे बनवा. रस्त्याच्या कडेचे खाद्यपदार्थ टाळा कारण तेथून अन्नसंसर्ग होऊ शकतो.

पर्यावरणविषयक धोक्यांपासून दूर रहा. उदाहरणार्थ, अतितीव्र-सुगंधी स्वच्छता पुरवठा साधने, सॉल्व्हेंट्स, कीटक नाशके आणि रंग यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तुम्ही एखाद्या परिस्थितीत असाल जिथे ते अपरिहार्य आहेत, रबरचे हातमोजे घाला आणि तुमची खोली हवेशीर आहे याची खात्री करा.

पालक बनण्यासाठी स्वत: ला तयार करा. तुमच्या बाळाच्या वाढ आणि विकासाच्या प्रक्रियेची तुमची समज तुमच्या पालकत्वाच्या  शैलीवर लक्षणीय परिणाम करते. तर, गर्भधारणेदरम्यान निरोगी वर्तन जाणून घ्या आणि तुमच्या जोडीदाराशी आणि तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुम्ही बाल विकास, मुलांचे जन्म आणि पालकत्वावर आधारित जन्मापूर्वीच्या वर्गांना देखील उपस्थित राहू शकता.

4. ताण कमी करा.

होऊ घातलेल्या मातेस ताण आणि चिंता यापासून दूर राहणे फार महत्वाचे आहे. ताणामुळे तुम्हाला  गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब किंवा योनीतून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकते.

ताण कसा टाळावा?

तुमच्यावर दबाव आणणार्या प्रथा आणि सवयी टाळा. उदाहरणार्थ, काही लोकांबद्दल तुम्हाला नकारात्मक भावना असल्यास, त्यांना आता टाळा. तसंच, शारीरिक श्रम हालचाल किंवा घाईघाईने  स्वयंपाक करणे हा तुमचा मार्ग नसेल, तर ते आता करण्यापासून स्वत:ला रोखा.

विश्रांती तंत्र वापरून पहा. काही विश्रांती तंत्रांसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

हलक्या व्यायामामुळे ताण घटतो हे सिद्ध झाले आहे. चालण्यासाठी बाहेर जा. हलका व्यायाम करा. तथापि, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा एका प्रमाणित प्रशिक्षका अंतर्गत व्यायाम करा.

सकारात्मक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवते. तुम्ही स्वत: अशा गोष्टी करा ज्यामुळे तुमच्या आत आणि तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. उदाहरणार्थ, ही तुमचे छंद जोपासण्यासाठी एक उत्तम वेळ असू शकते.

संपर्क साधा. तुमच्या जोडीदारासह तसेच जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबतचा संपर्क तुमच्या शरीरातील तणाव लक्षणीय प्रमाणात बाहेर काढतो.

विश्रांती आणि झोप: तुम्ही सुमारे 10 तास (दुपारी 2 तास आणि रात्री 8 तास) अंथरुणावर झोपावे.

5. शारीरिक व्यायाम.

व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली सौम्य व्यायाम केल्याने तुम्हाला इच्छित वजन राखण्यासाठीच नव्हे तर तुमचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते, बद्धकोष्ठता आणि पाठदुखीसारखे त्रास कमी करते आणि पचन आणि रक्ताभिसरण सुधारते.

कोणत्या प्रकारचा व्यायाम?

वाढत्या गर्भाशयाला चांगला आधार देताना ओटीपोटाचे जमिनीवरील योग्य व्यायाम केल्याने तुमचे ओटीपोटाचे स्नायू आणि सांधे मजबूत होतात. व्यायाम केल्यामुळे बाळाच्या जन्माची प्रक्रिया देखील सुलभ होते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्रमाणित प्रशिक्षका अंतर्गत व्यायाम करा.

6. जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करा. जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर ते सोडून देण्याची ही वेळ आहे. याचे कारण म्हणजे धुम्रपान तुमच्या फुफ्फुसावरच नव्हे तर तुमच्या वाढत्या गर्भास देखील हानी पोहोचवते. अप्रत्यक्ष धुम्रपान सुद्धा हानिकारक असू शकते. धुम्रपानमुक्त वातावरणात रहा, मदय सोडून द्या आणि तणावामुक्त उपचार पद्धतीचा अवलंब करा.

थोडक्यात, आरोग्य ही संपत्ती आहे. ही जुनी म्हण कदाचित ठोकळेबाज वाटेल, पण ती सदासर्वदा बरोबर आहे. आणि चांगली बातमी अशी की, तसे रहाणे खूप सोपे आहे

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.