सुरुवातीचे काही आठवडे तुम्हाला बाळाला तर 2 ते 3 तासांनी स्तनपान देण्याची गरज पडेल. त्यामुळे 24 तासांच्या कालावधीत तुमचे बाळ फक्त एका दिवसात 8 ते 12 वेळा दूध पिईल. त्यामुळे असे वाटेल की तुम्ही दिवसभर बाळाला स्तनपान देत आहात, विशेषतः तुम्ही अजून शिकत असताना आणि प्रत्येक स्तनपानाला जवळपास 60 मिनिटे लागू शकतात. मात्र, त्यामुळे निराश होऊ नका, तुमचे बाळ मोठे होईल तसा त्याच्या पोटाचा आकारही वाढेल, त्यामुळे ते प्रत्येक स्तनपानाच्या वेळी जास्त दूध पितील आणि त्यामुळे त्याची दूध पिण्याची वेळ वाढून दर 3 ते 4 तासांची होईल. तुमच्या बाळाला शक्य तितक्या वेळा आणि त्यांना हवे तितके वेळा, अगदी रात्रीसुद्धा दूध पाजा. जसजसे तुमचे बाळ मोठे आणि प्रगल्भ होत जाते तसतसे त्याला कमी वेळा स्तनपानाची गरज पडेल.
तक्त्याचा उपयोग होऊ शकतो, पण लवकरच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बाळाला त्याच्या मागणीनुसार दूध पाजणे आणि स्तनपानाचे वेळापत्रक विसरून जाणे हे सहसा सोपे असते. तुम्ही आणि तुमचे बाळ शिकत असताना, तुम्हाला वेळापत्रकाला चिकटून राहण्यासाठी स्वतःवर जास्त ताण घ्यायची गरज नसते, मला खात्री आहे तेदेखील वेळेवर घडेल. अनेक पूर्ण वाढ झालेल्या, निरोगी बाळांना दूध पिण्याची वेळ कधी झाली आहे ते उत्तम समजते आणि त्यानंतर तेच तुम्हाला कधी स्तनपान द्यायचे, किती वेळ द्यायचे आणि किती द्यायचे हे तेच तुम्हाला सांगतील.
तुमच्या बाळाचे वजन आणि विकास योग्य प्रमाणात होत आहे ना याची खातरजमा करण्यासाठी तुमची स्थानिक परिचारिका, जनरल फिजिशियन किंवा बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून वजन आणि वाढ तपासून घ्यावे. काही समस्या आहे असे तुम्हाला वाटले तर तुमच्या सपोर्ट टीमकडून सल्ला घ्या, सुरुवातीलाच काळजी घेतल्यास चांगला परिणाम साध्य होतो.
क्लस्टर फीडिंग
तुमचे बाळ क्लस्ट फीडिंग करत असल्याचे तुमच्या लक्षात येईल, विशेषतः ते अगदी लहान असेल किंवा जन्माच्या वेळी त्याचे वजन कमी असेल तर त्यांना वारंवार स्तनपान देण्याची गरज असते. याचा अर्थ असा की, काही वेळेला बाळाला सतत स्तनपान करावे लागते आणि काही वेळेला ते अगदी कमी दूध पिते. सर्वसामान्यपणे क्लस्टर फीडिंगचे हे प्रकार दुपारी उशिरा किंवा संध्याकाळी लवकर आढळून येतात. यामुळे कधीकधी बाळ जास्त वेळ झोपण्याचा प्रकारही आढळतो. क्लस्टर फीडिंगचा अर्थ दुधाची कमतरता असा होत नाही, तर हे अगदी लहान किंवा कमी वजनाच्या बाळांमध्ये स्तनपानचा सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. स्तनपान करणार्या बाळांना अति दूध पाजणे कठीण असते कारण त्यांना भूक लागली असेल तरच ते दूध पितात.
झपाट्याने वाढ
बाळांची वाढ झपाट्याने होत असेल तरीही ते जास्त वेळा दूध पिऊ शकतात. अगदी लहान किंवा कमी वजनाच्या बाळांमध्ये आढळणार्या क्लस्टर फीडिंगप्रमाणे हे मानून गोंधळू नये. यामध्ये बदल होऊ शकतो, पण सर्वसाधारणपणे तुमचे बाळ दोन ते तीन आठवड्यांचे, सहा आठवड्यांचे आणि तीन महिन्यांचे असताना त्यांची झपाट्याने वाढ होत असल्याचे तुम्हाला आढळेल. तुम्ही काही दिवस मागणीप्रमाणे दूध पाजलेत तर ही वेळही निघून जाईल आणि पुरवठा व मागणी यांच्यामधील संतुलन पुन्हा प्रस्थापित होईल.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews