तुम्हाला खालीलप्रमाणे लक्षणे आढळून आली तर सामान्य योनीमार्गाने प्रसूती होते:
बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेने घाबरून जाऊ नका. या आव्हानासाठी तुमचे शरीर स्वतःच तयार होत असते. प्रसूतीकळांदरम्यान दीर्घ श्वास आणि थोडासा धीर धरल्यास तुम्ही या आव्हानाचा सामना करू शकाल.
- लाईटनिंग किंवा जेव्हा बाळ ओटीपोटाच्या खालील भागात पडते किंवा सरकते
- तीव्र आणि नियमित आकुंचन पावणे
- पाठी खालील बाजूला दुखणे आणि पाठीत न थांबणारा ठणका
- म्युकस प्लग पुढे जाणे
- पाणी फुटणे
बाळ कसे जन्माला येते ते इथे दिलेले आहे :
पहिला टप्पा
पहिला टप्पा प्रसूती कळांनी सुरू होतो आणि सर्विक्स उघडल्यानंतर हा टप्पा संपतो. हा टप्पा साधारणपणे 12-19 तास चालतो. तुमची प्रसूतीची तारीख जवळ येत असताना, तुमच्या बाळाचे डोके खाली वळून त्याचा चेहरा तुमच्या पाठीकडे होतो. मात्र, अधूनमधून बाळ आईच्या पोटाच्या बाजूने चेहरा करते आणि त्यामुळे पाठीमध्ये तीव्र वेदना होतात. या काळामध्ये आकुंचन पावणे अतिशय जोरदार असते आणि आरामाचा कालावधी कमी असतो, कारण सर्विक्स काही सेंटीमीटरने प्रसारण पावत असते.
दुसरा टप्पा
सर्विक्स पूर्ण उघडल्यानंतर, या टप्प्याला बाळ जन्माला येते, हा कालावधी 20 मिनिटे ते 2 तास टिकतो. या टप्प्याला, आई बाळाला योनीमार्गाकडे ढकलते आणि आधी बाळाचे डोके बाहेर येते, त्यानंतर उरलेले शरीर बाहेर येते. एकदा बाळ जन्माला आले की बाळाला आईशी जोडणारे नाळ कापली जाते.
तिसरा टप्पा
प्रसूतीचा तिसरा आणि अंतिम टप्पा असतो तो गर्भाशय आकुंचन पावण्याचा आणि बाळाच्या जन्मानंतर प्लॅसेंटा पूर्णपणे बाहेर टाकण्याचा. जन्मानंतर लवकरच, गर्भाशय आकुंचन पावायला लागते आणि हा टप्पा 5 ते 30 मिनिटांमध्ये पूर्ण होतो. या टप्प्यादरम्यान तुम्हाला थंडी वाजू शकते आणि अंग थरथरू शकते (हुडहुडी).
काही विशेष वैद्यकीय परिस्थितीमध्ये बाळाच्या जन्मासाठी तुम्हाला सी-सेक्शन किंवा सिझेरियन प्रसूती करावी लागू शकते.
तुमची दीर्घ प्रतीक्षा लवकरत संपेल आणि तुम्ही तुमच्या लहानशा बाळाला तुमच्या हातात घ्याल.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews