Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
How Much Weight Should I Gain During Pregnancy

गर्भधारणेदरम्यान मी किती वजन वाढवावे?

(0 reviews)

तुम्ही एका निरोगी मुलाला जन्म देण्यास  स्वतःला तयार करण्यासाठी बरेच काही करू शकता. सर्वात महत्वाचे गोष्टींपैकी  एक म्हणजे अतिरिक्त वजन मिळवण्याकरता योग्य आहार घेणे तुम्हाला अन्य जीवाला मदत करण्यासाठी आवश्यक असेल. तुमच्या गर्भधारणेदरम्यान तुमचे डॉक्टर  तुम्हाला योग्य श्रेणीत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या वजन वाढीवर लक्ष  ठेवतील.

Thursday, December 14th, 2017

योग्य प्रमाण काय आहे?

प्रत्येक गर्भधारणा वेगळी आहे, परंतु बाळाचे वजन आणि तुमच्या गर्भाशयात तुमच्या बाळाला पोषण मिळण्यासाठी मेदाचा साठा आणि स्तनपान करवण्याकरता स्त्रिया साधारणपणे 11 ते 16 किलो वजन मिळवतात. तुम्ही जादा वजन किंवा कमी वजनाच्या असल्यास, तुमचे डॉक्टर हे समायोजित करू शकतात.
शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालन करा.
गरोदरपणामध्ये हळूहळू आणि सातत्याने वजन वाढवण्याचा प्रयत्न करा, पण लक्षात ठेवा की सर्व स्त्रियांचा वजन वाढण्याची गती  वेगवेगळी असते. तुमच्या डॉक्टरने केलेल्या शिफारशींचे पालन करणे आवश्यक असते, कारण गरोदरपणात खूप कमी किंवा खूप जास्त वजन वाढल्यामुळे अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तुम्ही किती अन्न खाता याबरोबरच तुम्ही किती सकस आहार घेता यालाही महत्त्व आहे.

निरोगी वजन: तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले

  • अगदी योग्य. जेव्हा तुमचे वजन योग्य प्रकारे वाढत असते तेव्हा गुंतागुंत निर्माण करणारी एक गोष्ट कमी होते. तुमचे आरोग्य आणि गरोदरपणापूर्वीचे तुमचे वजन यानुसार तुमच्यासाठी किती वजन वाढणे योग्य असेल ते तुमचे आरोग्य व्यावसायिक ठरवतील.
  • अगदी कमी. तुमच्या र्यावाढणार्या बाळाला पोषणमूल्यांची गरज असते, आणि तुम्ही तुम्हा दोघांसाठी पुरेसे खाल्ले पाहिजे. तुमचे वजन पुरेसे वाढले नाही तर तुम्ही तुमच्या बाळाला आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांपासून वंचित ठेवत असाल. त्यामुळे डॉक्टरांनी वजन वाढण्यासंबंधी तुम्हाला आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
  • अगदी जास्त. काही महिला गरोदरपणामध्ये वजन वाढवले पाहिजे म्हणून खाण्यापिण्याच्या सर्व निरोगी सवयी मोडताना दिसतात. ही चांगली गोष्ट नाही कारण त्यामुळे तुमच्या हृदय व सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो, तुमच्या पाठदुखीची शक्यता वाढते आणि इतर आरोग्य समस्या वाढतात – त्याशिवाय एकदा बाळ जन्माला आले की तुम्हाला पुन्हा पूर्वीच्याच आकारात परत येणे अधिक कठीण जाते.

पोटामध्ये जास्त अन्न राहत नाही?
पहिल्या तीन महिन्यांमध्ये, सकाळी र्याहोणार्या त्रासातून होणार्यार्या उलट्या व मळमळ यामुळे तुमचे वजन काहीसे कमी होऊ शकते. चिंता करू नका – तुमच्या पोटात अन्न राहत नसेल तरीही तुमच्या बाळाच्या पोषणमूल्यांची गरज भरून निघेल. मॉर्निंग सिकनेसच्या काळात तुमच्या वजनाबद्दल चिंता वाटत असेल तर त्याबाबतीत नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण त्यातूनच तुम्हाला आतापर्यंत न दिसलेला उपाय मिळू शकतो. 
टिपा

  • गरोदर राहण्यापूर्वी, तुमचे वजन योग्य आहे का यासंबंधी आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. गर्भधारणा होण्यापूर्वी तुमचे वजन निरोगी असणे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी योग्य असते.
  • गरोदर असताना डाएट करणे योग्य नाही : त्यामुळे तुम्हाला आणि बाळाला आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांमध्ये झपाट्याने घट होण्याचा धोका असतो, आणि त्यामुळे तुमच्या बाळात्या विकासावर परिणाम होऊ शकतो. गरोदरपणामध्ये तुम्हाला वजनासंबंधी मार्गदर्शन हवे असेल तर आहारतज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता.
  • प्रथिनेयुक्त निरोगी संतुलित आहार घ्या. प्रथिनांच्या आधारावर आपल्या शरीराची उभारणी होत असते, त्यामुळे तुमच्या शरीरात एक संपूर्ण दुसरे शरीर आकार घेत असते तेव्हा प्रथिने हा तुमच्या आहारातील अगदी महत्त्वाचा पोषण घटक असतो.
  • तुमचा आहार फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम यांनी समृद्ध असेल याची खबरदारी घ्या. किंवा तुमच्या आहारतज्ज्ञ अथवा डॉक्टरने शिफारस केली असेल तर तसा पूरक आहार घ्या. फॉलिक अॅसिड मज्जासंस्थेच्या नलिकेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, तर लोह आणि कॅल्शियम हे तुमच्या व तुमच्या बाळाच्या रक्तपेशी आणि हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात.
  • तुम्हाला तुमचा आहार किंवा व्यायामाची दिनचर्या बदलायची असेल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आठवडाभर मध्यम प्रकारचा व्यायाम केला तर तुम्हाला गरोदरपण आणि बाळाचा जन्म या काळात शक्ती व तग धरण्याची क्षमता राखण्यात अतिशय उपयुक्त ठरू शकते.
  • गरोदरपणात वजन वाढत असेल तर त्याचा अभिमान बाळगा, कारण त्याचा अर्थ होतो की बाळाची वाढ चांगली होत आहे, तुमचे वजन खूप जास्त किंवा खूप कमी वाढत आहे अशी तुम्हाला चिंता वाटत असेल तर तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाशी बोला.

जोखमी
अतिलठ्ठ मातांसाठी गुंतागुंती
गरोदरपणात तुमचे वजन जास्त वाढले असेल तर तुम्ही थोडी खबरदारी घ्यायला हवी. तुमचे बॉडी मास इंडेक्स (BMI) खूप जास्त असेल तर तुम्ही गुंतागुंतीचा धोका वाढवत असाल, तुम्ही याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. अति वजनामुळे तुम्हाल पूर्ण बरे व्हायला जास्त वेळ लागेल आणि बाळाला जन्म दिल्यावर तुमच्याकडे जितकी ऊर्जा असायला हवी त्यापेक्षा ती कमी असेल.
त्यांच्या बाळांसाठी गुंतागुंत
लठ्ठपणा हा फक्त तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही. तुमच्या अजून जन्माला र्यायेणार्या बाळावरही वाढ, विकास आणि सर्वसामान्य आरोग्याच्या समस्या याविषयी नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.