Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Getting Smart at Eating during Pregnancy

गरोदरपणात हुशारीने आहार करा

(0 reviews)

तुम्हाला गरोदरपणात योग्य आहार घेण्यासाठी येथे काही उपयुक्त टिपा आहेत.

Thursday, December 14th, 2017

तुमच्या दिवसाची सुरुवात करताना हंगामातील ताजी कापलेली फळे खा किंवा एक ग्लासभर फळांचा रस घ्या. कॅफेन असणार्या आणि कोणतेही पोषणमूल्य नसणार्या कॉफी किंवा चहाला सुट्टी द्या.

बदाम, अक्रोड असा सुकामेवा देखील दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम असतात.

तुम्हाला एखादा कप चहा किंवा कॉफी टाळणे अशक्य वाटत असेल तर, किमान जेवणाआधी, जेवण करताना किंवा जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेणे टाळा.

तुमच्या आहाराचे आधीच नियोजन करा आणि निरोगी अन्नपदार्थांचा साठा करून ठेवणे तुम्हाला गरोदरपणात हुशारीने आहार घेण्यात मदत होईल.

पूर्णपणे घरी तयार केलेला नाश्ता घ्या, जसे की पोहे, थालिपीठ, दही-पराठा, इडली-सांबार, चटणी-डोसा, भाज्यांचा उपमा, हे पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध आहेत.

धान्यापासून तयार करण्यात आलेल्या न्याहारीच्या पदार्थांमध्ये पोषणमूल्य भरपूर असतात, मात्र हे विसरू नका की ते अॅडिटिव्ह्ज, स्वाद आणि कृत्रिम रंग यांची प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आहेत.

तुम्हाला थोडे-थोडे आणि सतत काहीतरी खावे लागते, त्यामुळे तुमच्या आहाराच्या नियोजनामध्ये मध्य सकाळ आणि मध्य दुपारच्या आहाराचा समावेश करा. ताक, लस्सी, मूठभर शेंगदाणे/भाजलेले मखना, कडधान्ये हे पदार्थ दोन जेवणांच्या मध्ये तोंडात टाकण्यासाठी उत्तम पर्याय असतात.

दुपारच्या आणि रात्रीच्या पोषक जेवणासाठी, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, राजगिरा यांच्यापैकी पूर्ण धान्याची निवड करा, त्यासोबत भाज्या आणि डाळी, शेंगा, अंडी, मासे किंवा चिकन असे प्रथिनयुक्त पदार्थ खा.

पदार्थांची पाचकता वाढवणारे, तसेच त्यामधील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे आणि क जीवनसत्व वाढवणारे मोड आणणे आणि आंबवणे अशा पद्धती वापरा.

दोन जेवणांमध्ये जास्त वेळ ठेवणे, उपवास करणे किंवा दारू पिणे टाळा.

संपूर्ण धान्य, डाळी, शेंगा, दूध आणि दुधाचे पदार्थ, मोसमी फळे आणि भाज्या असे विविध प्रकारचे अन्नपदार्थ खा.  

उत्तम प्रमाणात प्रथिने मिळवण्यासाठी मासे, चिकन, अंडी यांचा तुमच्या आहारात समावेश करा. तुम्ही शाकाहारी असाल तर उत्तम प्रमाणात प्रथिने मिळवण्यासाठी एका दिवसाच्या आहारामध्येधान्य, डाळी आणि दुधाचे पदार्थ यांचे संयोजन किंवा समावेश करा.

तुमच्या कोशिंबिरीमध्ये थोडा प्रथिनांचा समावेश करण्यासाठी काही मोड आलेले मूग/उकडलेले दाणे/पनीरचे तुकडे यांचा समावेश करा.

बद्धकोष्ठ टाळण्यासाठी रेषेंनी समृद्ध असलेल्या (तंतुमय) अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करा, कारण त्यामध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम सहज मिळते.

तुम्ही तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळे, मोड आलेल्या शेंगा आणि आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करून त्यातील जास्तीत जास्त लोह तुमच्या शरीरात शोषले जाईल याची तुम्ही खबरदारी घेऊ शकता.

कोणतीही गोष्ट अति खाणे टाळा. लोणची, सॉस अशा पदार्थांमध्ये जास्त मीठ असते ही बाब लक्षात ठेवा.

दररोज 8-12 ग्लास पाणी पिऊन शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण कायम ठेवा.

पोषक पदार्थ खाण्यापासून वंचित राहाल अशी कोणतीही चुकीची पावले टाकू नका.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Search

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.