जर तुमच्या गरोदरपणामध्ये कोणत्याही गुंतागुंती किंवा चिंता नसतील, तर तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये बरासचा काळ तुम्ही प्रवास करू शकता. तरीसुद्धा, तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी डॉक्टर अनिवार्य परिस्थिती वगळता तुम्हाला 30 आठवड्यांनंतर प्रवास टाळण्याचा सल्ला देतात.
सुरक्षित आणि तितकेसे सुरक्षित नसलेले कालावधी.
पहिल्या तिमाहीत प्रवास करणे टाळा. पहिल्या तिमाहीत प्रवास करण्याचा सल्ला दिला जात नाही. या टप्प्यामध्ये गर्भ स्वतःला आईच्या गर्भाशयाशी जोडून घेत असतो, त्यामुळे गर्भपात किंवा गुंतागुंत वाढण्याच्या शक्यता जास्त असतात.
दुसरी तिमाही सुरक्षित असते. तथापि, एकदा तुम्ही 13वा आठवडा ओलांडला की, तुम्ही दुसर्या तिमाहीत पोहोचता, कोणतीही गुंतागुंत नसेल तर गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत तुलनेने हा सुरक्षित कालावधी असतो. दुसर्या तिमाहीमध्ये मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी होतो आणि तुम्ही अधिक आरामात आणि सहजतेने राहता.
तिसरी तिमाही. तिसर्या तिमाहीदरम्यान तुम्ही जवळपास संपूर्ण कालावधी पूर्ण करता आणि तुम्हाला हालचाल करण्यात किंवा जास्त वेळ बसण्यात अवघडलेपणा जाणवतो. या काळात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो.
गरोदरपणात लांबचा प्रवास टाळावा. गरोदरपणात प्रवास करण्याचा निर्णय हा तुम्ही किती आरामात आहात आणि डॉक्टरांचा सल्ला काय आहे यावर अवलंबून असतो. दूरवर सहली काढणे टाळा किंवा कमी ऑक्सिजन असलेल्या उंच ठिकाणी प्रवास करणे टाळा, त्यामुळे श्वसनाला त्रास होऊ शकतो. प्रवास करण्यापूर्वी तुम्ही आरामात आणि सहज आहात याची खबरदारी घ्या.
प्रवासादरम्यान स्वच्छतेच्या टिप.
गरोदर स्त्रीसाठी स्वच्छतेचे महत्त्व अधिकच असते. या ठिकाणी काही लक्षात ठेवण्याचे मुद्दे दिले आहेत:
तुमचे हात स्वच्छ ठेवा : संसर्ग टाळण्यासाठी नेहमी हँड सॅनिटायझर जवळ बाळगा.
पिण्याच्या पाण्याबाबत खबरदारी घ्या: प्रवासात असताना नेहमी तुमची स्वतःची पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ ठेवा किंवा बाटलीबंद पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरात पुरेसे पाणी असेल आणि तुम्हाला पाण्यापासून उद्भवणारे संसर्गजन्य आजारही होणार नाहीत.
सार्वजनिक शौचालयांचा वापर :तुम्हाला सार्वजनिक शौचालयात जायचेच असेल तर ते स्वच्छ, कोरडे आणि पुरेसे प्रकाशमान असण्याची खबरदारी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला घसरून इजा होणार नाही. विल्हेवाट लावता येण्याजोगे सीट कव्हर्स असतील तर त्याचा वापर करा. स्वच्छता राखा जेणेकरून तुम्हाला संसर्ग होणार नाही.
प्रवासाचे अगदी योग्य साधन निवडणे.
तुम्ही समंजसपणे प्रवासाचे साधन निवडले पाहिजे. तुम्हाला सर्वात जास्त आरामदायी वाटेल आणि तुम्हाला कोणत्याही त्रासाविना प्रवास पूर्ण करता येईल असे साधन निवडा.
रस्त्यामार्गे प्रवास करणे :रस्त्याने प्रवास केल्यामुळे तुम्ही थकू शकता. म्हणून असे साधन निवडा की ज्यामुळे तुमच्या प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच तुम्हाला प्रवासाचा अधिक ताण होणार नाही. बसपेक्षा कार कधीही चांगल्या कारण बसमध्ये रस्त्याचे धक्के आणि हादरे बसतात, अर्थात तुम्ही कारमध्येही खूप काळजी घ्यायला हवी. असे अचानक बसणारे धक्के आणि हादरे टाळण्यासाठी तुमचा सीटबेल्ट व्यवस्थित बांधून घ्या. पुढील वाहनाच्या डॅशबोर्डपासून सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून अचानक ब्रेक लावण्याची गरज पडली तर धडक बसणार नाही. अचानक धक्का बसल्यास इजा होऊ नये यासाठी पुढील सीटवर बसणे टाळा.
सुरक्षित रस्ता प्रवासासाठी टिपा.
सीट बेल्ट: तुमच्या पोटावर विनाकारण ताण येऊ नये यासाठी सीटबेल्ट नाभीच्या खाली घट्ट बांधावा.
फराळ: पहिल्या तिमाहीत प्रवासादरम्यान पोषक आणि सकस फराळाचे पदार्थ जवळ ठेवल्यास मळमळीचा त्रास होत नाही आणि तुमची ऊर्जेची पातळीही कायम राहते.
आराम करा: प्रत्येक एक किंवा दोन तासांनी पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरा, जेणेकरून शरीरातील रक्ताभिसरण कायम राहील.
आराम: तुमच्या पाठीला आराम देण्यासाठी आणि आरामात बसण्यासाठी तुम्ही सोबत उशीर बाळगू शकता.
डॉक्टरांचा सल्ला: गरोदरपणात प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही प्रवासाचा विचार करावा की नाही याचा सल्ला द्यायचा अधिकार डॉक्टरांना आहे.
रेल्वेने प्रवास करणे.
रस्त्यावरील प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित असतो कारण अचानक धक्के आणि हादरे बसण्याचे प्रमाण कमी असते. कमी धक्के आणि पाय पसरण्यासाठी व पडण्यासाठी पुरेशी जागा यामुळे तुम्ही तुमची बसायची/झोपायची स्थिती बदलत आणि इकडेतिकडे फिरत आरामात अंतर पार करू शकता.
तुम्ही उभे राहताना किंवा फिरताना कठड्यांना धरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. चढताना आणि उतरताना काळजी घ्या आणि फुटबोर्डविषयी दक्ष असा.
हवाई मार्गाने प्रवास करणे.
हवाई मार्गाने प्रवास करणे हा सर्वात आरामदायी आणि सुरक्षित मार्ग असतो. एसल सीट घ्या, जेणेकरून तुम्ही पाय पसरू शकाल आणि आरामात बसाल. उंच स्थानावर ऑक्सिजन विरळ होत जात असला तरी तुम्ही त्याची चिंता करू नका कारण विमानात ऑक्सिजनचा दाब पुरेसा असतो.
32 आठवड्यांनी प्रवास करायचा असेल तर हवाई मार्ग टाळा.
टिप : हवाई मार्गाने प्रवासावर लेखाची लिंक
सागरी मार्गाने प्रवास करणे.
गरोदरपणात सागरी मार्गाने प्रवास हा सर्वसामान्यपणे सुरक्षित असतो. याचा एकच तोटा असतो, तो म्हणजे सागरी मार्गामुळे होणार्या त्रासाने मळमळ होण्याचे प्रमाण वाढते. बोट किंवा क्रुझने प्रवास करण्यापूर्वी तुम्ही काही सावधगिरीचे उपाय केले पाहिजेत: क्रुझच्या मध्यभागी असलेल्या भागाजवळ केबिन घ्या कारण त्या ठिकाणी सर्वात कमी धक्के बसतात.
तुमची औषधे आणि वैद्यकीय अहवाल तुमच्या जवळ सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने ठेवा.
क्रुझवर स्वच्छ आणि सुरक्षित अन्नच घ्या.
तुमच्यासोबत नेहमी हलका फराळ ठेवा.
वारंवार हलके अन्नपदार्थ खात राहा.
जहाजावर तुमच्यासाठी किमान मूलभूत वैद्यकीय सुविधा आणि जवळपासच्या किनार्यावर योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याची खबरदारी घ्या.
क्रुझवरील प्रसाधनगृहे नेहमी स्वच्छ असतील याची खबरदारी घ्या, कारण गरोदरपणात संसर्ग होण्याची भीती बरीच जास्त असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रवासाला जाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
त्याशिवाय, तुम्ही एक मिनिटही हे विसरता कामा नये, की तुम्ही एकट्या प्रवास करत नाही आहात. तुमच्याहून कितीतरी अधिक नाजूक असलेले कोणीतरी सातत्याने तुमच्यासोबत आहे. त्यामुळे गरोदरपणात प्रवास करताना अधिक काळजी घेण्याची गरज असते.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews