गरोदरपणाची चाचणी कसे काम करते?
फलित अंडे गर्भाशयाच्या भिंतीशी जोडले जाते (चिकटते) तेव्हा, शरीर ह्युमन कोरियॉनिकगोनॅडोट्रॉपिन (hCG) हे हार्मोन स्रवते. गर्भधारणा झाल्यापासून केवळ 10 दिवसांमध्ये गरोदर महिलेच्या रक्त आणि लघवीची चाचणी करून hCG आहे की नाही ते शोधता येते. गरोदरपणाच्या चाचणीमध्ये रक्त किंवा लघवीमध्ये HCG आहे की नाही ते शोधते.
गरोदरपणाची रक्ताची चाचणी
गरोदरपण निश्चित करण्यासाठी डॉक्टर अनेकदा ही चाचणी करतात. निकाल मिळण्यासाठी काही तासांपासून एका दिवसाचा कालावधी लागतो. चाचणी घेण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जातात आणि रक्तामध्ये असलेले hCG थोडे प्रमाणही सहज शोधता येते.
गरोदरपणाची लघवीची चाचणी
गरोदरपणाची लघवीची चाचणी सकाळी करण्याचा प्रयत्न करा कारण यावेळेला लघवीमधील hCG प्रमाण सर्वात जास्त असते.
hCG शोधण्याची ही सोपी घरीच करायची गरोदरपणाची चाचणी आहे, त्याचा निकाल 1 ते 2 मिनिटांमध्ये मिळतो. लघवीची चाचणी करण्याच्या पद्धती जवळपास सारख्याच असतात आणि तुम्ही चाचणीसाठी कोणते किट वापरत आहात त्यावर ते अवलंबून असते. वापरल्या र्याजाणार्या निरनिराळ्या पद्धती याप्रमाणे असतात :
- मूत्रमार्गामध्ये टेस्ट स्टिक धरणे किंवा
- लघवी एका विशेष कपामध्ये घेणे आणि त्यानंतर स्टिक बुडवणे किंवा
- लघवी एका विशेष कपामध्ये घेणे आणि त्यानंतर ड्रॉपरच्या सहाय्याने लघवीचा एक थेंब रासायनिक पट्टीवर टाकणे
या पायरीनंतर, दिलेल्या सूचनांनुसार काही मिनिटे वाट बघा आणि बघ रिझल्ट विंडो तपासा. त्यावर एक रेषा किंवा अधिकचे चिन्ह दिसल्यास तुम्ही गरोदर आहात हे दर्शवणारा सकारात्मक निकाल सूचित करतो.
तुमची मासिक पाळी चुकल्याच्या पहिल्याच दिवशी घरीच गरोदरपणाची चाचणी करू शकता.
- मात्र, रक्तामध्ये hCG चे प्रमाण वाढल्यानंतरच लघवीची चाचणी सकारात्मक निकाल दाखवते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात hCG चे प्रमाण कमी असताना ही चाचणी नकारात्मक परिणाम दर्शवू शकते.
- कधीकधी एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल, गर्भपात केला असेल किंवा गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली असेल तर ही चाचणी सकारात्मक निकाल दर्शवते.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews