23 आठवड्यांची गर्भवती
तुमचे बाळ आता तुमच्या हालचालींना प्रतिसाद द्यायला लागते.
या टप्प्याला तुमच्या बाळाच्या त्वचेवर सुरकुत्या असतात. एकदा त्वचेखाली चरबी जमा व्हायला लागली की त्यामध्ये बदल होईल. या टप्प्याला बाळाची लांबी 20 सेंमी पेक्षा जास्त असते आणि वजन असते 450 ग्रॅम, तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही हालचाली करताना तुमचे बाळही हालचाली करत आहे. स्वतःची अधिक काळजी घ्या, सौम्य वागा.
24 आठवड्यांची गर्भवती
आता केस वाढायला सुरुवात होते.
बाळाची उंची 22 सेंमी असते आणि वजन 680 ग्रॅम असते, चरबी साठायला अजून वेळ आहे त्यामुळे तुमचे बाळ अगदी सडपातळ दिसते. केस वेगाने वाढायला लागतात, आणि तुम्हाला ते दिसत असले तरी, तुम्हाला त्याचा रंग दिसणार नाही कारण अजून केसांमध्ये रंगद्रव्ये विकसित झालेली नाहीत. मेंदूचा तेजीने विकास होत आहे, आणि पुढील तीन महिन्यांमध्ये सुरकुत्या असलेली, अर्धपारदर्शक त्वचा मुलायम होईल.
25 आठवड्यांची गर्भवती
तुमच्या बाळाच्या फुप्फुसाच्या शाखा विकसित होत आहेत.
तुमच्या बाळाची लांबी आता 23 सेंमी आहे आणि वजन 750 ग्रॅम. तुमच्या बाळाची फुप्फुसे श्वसनासाठी तयार होत आहेत, त्यांच्या शाखा आणि सर्फॅक्टंट निर्माण होत आहेत, सर्फॅक्टंट हा पदार्थ बाहेरील जगामध्ये श्वास घेण्यासाठी मदत करतो.
26 आठवड्यांची गर्भवती
तुमचे बाळ श्वसनासाठी तयार होते.
तुमचे बाळ हळूहळू काही हालचाली विकसित करते, ज्याचा त्याला जगामध्ये पहिला श्वास घेण्यासाठी उपयोग होईल, ते अॅम्नियॉटिक द्रव आत घेण्यास आणि बाहेर सोडण्यास शिकते. तुमच्या बाळाच्या कानामधील मज्जातंतू विकसित होत आहेत आणि आणि अधिक संवेदनशील होत आहेत, अगदी ते स्वतःच्या पालकांच्या आवाजात फरक करायला शिकते.
27 आठवड्यांची गर्भवती– तुमच्या तिसर्या तिमाहीची सुरुवात
तुमचे बाळ निद्रा-जाग चक्र विकसित करते.
आता तुमच्या बाळाची डोके ते पायाचा अंगठा अशी लांबी मोजता येते – आधी, त्याचे पाय स्वतःच्या धडाभोवती गुंडाळलेले होते, त्यामुळे ते मोजणे कठीण होते. आता तुमच्या बाळाचे वजन 900 ग्रॅम आहे आणि त्याची लांबी 38 सेंमी आहे, आणि आता त्याला अधिकाधिक शिस्त लागत आहे. आता ते नियमित वेळापत्रकानुसार झोपते आणि जागे होते आणि कदाचित स्वतःची बोटेसुद्धा चोखते. तुम्हाला त्याच्या तालबद्ध हालचाली जाणवू शकतील – तुमच्या बाळाला उचक्या लागत आहेत! हे फार काळ टिकत नाही आणि तुम्ही त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews