अल्ट्रासाउंड स्कॅन तुमच्या बाळाची स्थिती आणि त्याचे सभोवताल दाखवते.
प्रतिमेमध्ये हाडांसारख्या कठीण ऊती पांढरा भाग म्हणून दिसतात, आणि सौम्य ऊती राखाडी आणि ठिपक्यांसारख्या दिसतात. अॅम्नियॉटिक द्रवासारखे द्रवपदार्थ कोणताही प्रतिध्वनी परत पाठवत नाहीत, त्यामुळे ते काळे दिसतात. पांढरे, राखाडी आणि काळे यांच्या निरनिराळ्या छटांवरून डॉक्टरांना या प्रतिमेचे आकलन करण्यास मदत होते. या प्रतिमेमध्ये बाळाची स्थिती आणि त्याच्या हालचाली तसेच त्याचे आरोग्य व सभोवताल दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे 3D आणि 4D रंगीत स्कॅन विकसित करणेही सुलभ झाले आहे. त्यामुळे तुमच्या बाळाच्या अधिक स्पष्ट प्रतिमा दिसतात.
अल्ट्रासाउंड स्कॅनची कार्यपद्धती साधी असते.
तुमची सोनोग्राफर या प्रक्रियेसाठी तुम्हाला मूत्राशय पूर्ण भरेल इतके पाणी पिऊन यायला सांगते. तुम्हाला तुमच्या मूत्राशयावर आलेल्या दबावामुळे थोडे अवघडल्यासाखे वाटेल पण त्यामुळे ध्वनीलहरी अधिक प्रभावीपणे तुमच्या गर्भाशयातून जाण्यास मदत होते. तुमच्या पोटावर लावलेल्या कंडक्टिंग जेलचा कोणताही डाग पडत नाही पण ते काहीसे थंड आणि ओले वाटू शकते. अल्ट्रासाउंड लहरींच्या कोणत्याही संवेदना जाणवत नाहीत.
अल्ट्रासाउंड स्कॅन अगदी सुरक्षित असते.
एक्स-रे प्रमाणे, अल्ट्रासाउंड स्कॅनिंगसाठी कोणतेही विद्युत प्रभारित आयन वापरत नाही. त्यामुळे, किरणोत्सर्गामुळे होणार्या कोणत्या विपरित परिणामांची भीती नसते. मात्र, अपुरे प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांनी हे स्कॅनिंग केले किंवा वाईट दर्जाची उपकरणे वापरली तर चुकीचे निदान होण्याची शक्यता असते.
अल्ट्रा साउंड स्कॅन आणि निरोगी गरोदरपणातील त्याचे महत्त्व.
निदान आणि गरोदरपणाची खातरजमा : अल्ट्रासाउंड स्कॅन गर्भधारणेच्या साडेचार ते पाच आठवडे इतक्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची पिशवी, योक पिवी आणि गर्भ हे दाखवते. गर्भाचे रोपण कुठे आहे तेदेखील ते दर्शवते आणि गर्भाशयाबाहेर गर्भ राहिला असेल तर तेही दाखवते.
योनिगत रक्तस्रावाच्या कारणांची ओळख: गर्भाच्या पिशवीच्या (जेस्टेशनल सेक) प्लॅसेंटाच्या आकृती आणि आकारावरून लवकरच्या गर्भावस्थेत होणार्या रक्तस्रावाची कारणे ते सहज ओळखू शकते. न समजलेले गर्भपात आणि धूसर (ब्लायटेड) अंडबीज सामान्यपणे खराब झालेली गर्भपिशवी आणि हृदय गतीचा अभाव दाखवतात. पहिल्या तिमाहीत रक्तस्राव असेल तर एक्तोपिक आणि मोलर गर्भावस्था अल्ट्रासाउंड स्कॅनवरून समजणे अपरिहार्य आहे.
गर्भधारणेचे वय आणि गर्भाचा आकार ठरवणे : गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात, गर्भाच्या शरीराचे मोजमाप हे शक्यतो अल्ट्रासाउंडच्या मदतीने केले जाते. ते गर्भाच्या गर्भधारणेचे वयदेखील दर्शवते.
गर्भासंबंधी काही विकृती असल्यास त्याचे निदान : गर्भाच्या रचनेतील अनेक विकृती, जसे की स्पिनाबिफिडा आणि डाऊन्स सिंड्रोम यांचे निदान गर्भधारणेचे वय 20 आठवडे होण्याच्या आधीच अल्ट्रा साउंडने विश्वसनीयरित्या करता येते.
प्लॅसेन्टाचे स्थान ठरवणे :प्लॅसेंटाचे स्थान ठरवणे आणि त्याच्या खालील कडा ठरवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे प्लॅसेंटा प्रेव्हिया आहे की नाही त्याचे निदान करणे शक्य होते.
एकापेक्षा जास्त गरोदरपण : एकापेक्षा जास्त गर्भधारणा झाली असेल तर गर्भांची संख्या ठरवण्यात अल्ट्रासाउंड अतिशय मोलाची भूमिका बजावते. तसेच ते गर्भाचे सादरीकरण, वाढ, मंदपणा, विसंगती आणि गर्भाच्या प्लॅसेंटा प्रेव्हिया असल्यास त्याचे अस्तित्व हेही यातून दिसते. तसेच एकापेक्षा जास्त गर्भधारणा असल्यास, जुळ्या बाळांचे एकमेकांना रक्तसंक्रमण होत असल्याचेही ते दर्शवते.
गर्भाची वाढ ठरवणे :तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके, हाललाची, आवाज आणि श्वसन ठरवण्यामध्ये अल्ट्रासाउंड महत्त्वाची भूमिका बजावते.
ओटीपोटाच्या विकृतीचे निदान : याचा उपयोग गरोदरपणात गर्भाशयाच्या आणि ओटीपोटाच्या विकृतींचे निदान करण्यासाठीही होतो, उदा. फायब्रोमायोमाटा आणि ओव्हारिन सिस्ट.
तुमच्या डॉक्टरांना तारखा विचारून घ्या.
तुम्ही अल्ट्रासाउंड स्कॅनिंग कधी केले पाहिजे याबद्दल काही ठोस नियम नाहीत. जेव्हा कधी तुमच्या आरोग्यानुसार तुमच्या गर्भाशयाची जवळून तपासणी करण्याची गरज भासेल त्यानुसार अल्ट्रासाउंड स्कॅनिंग कधी करावे याबद्दल तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील. पण सर्वसामान्यपणे, पहिले स्कॅनिंग हे गर्भधारणेच्या 7-8व्या आठवड्यात केले जाते, दुसरे स्कॅन 18-20 आठवड्यात आणि तिसरे 32व्या आठवड्यात केले जाते. तुमच्या बाळाची स्थिती, वाढ आणि हालचाली समजून घेण्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन महत्त्वाचे असते. अल्ट्रासाउंड स्कॅनची गरज आहे की नाही ते ठरवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews